खिशात पैसा टिकणार, व्यवसायात नफा होणार; 5 राशींच्या लोकांसाठी शनिवार गेमचेंजर ठरणार

horoscope in marathi : काहींच्या खिशात पैसा टिकणार आहे. तर काहींना व्यवसायात नफा देखील होण्याची शक्यता आहे.
TODAY HOROSCOPE in Marathi
TODAY HOROSCOPE Saam tv
Published On

मेष : तुमच्या आत्मविश्वासामुळे विरोधकांवर दबाव राहील. खिशात पैशांची कमी राहणार नाही. करिअरची नवी संधी मिळेल. ५ अंक शुभ ठरेल.

वृषभ : कुटुंबातील सदस्यांमध्ये महत्त्वाच्या विषयावर चर्चा होईल. कार खरेदीचा योग आहे. तुमच्या कामाचं लक्ष्य पूर्ण होईल. अतिउत्साहीपणा दाखवणे टाळा.

मिथुन : सामाजिक कार्य करण्याची संधी मिळेल. व्यापारात नफा होईल. कुटुंबात गोडवा टिकून राहील. आरोग्य चांगलं राहील.

कर्क : घर-कुटुंबात सुख-सुविधा वाढतील. घरात आलेल्या पाहुण्यांचा आदर कराल. कुंटुंब आणि भावकीत सन्मान वाढेल.

सिंह : जवळच्या मित्रांची साथ मिळेल. दिवसभरात तुम्हाचा अचानक लाभ मिळू शकतो. कुटुंबातील वरिष्ठांचं आरोग्य चांगलं राहील.

कन्या : दिवसभरात किरकोळ खर्च आणि गुंतवणूक वाढेल. परदेशी प्रवासाची इच्छा होईल. कामात नियमाचं उल्लंघन करू नका.

TODAY HOROSCOPE in Marathi
Monday Horoscope : संसारात गोडवा निर्माण होईल, खिशात पैसा टिकणार; ५ राशींच्या लोकांवर होणार भगवान शंकराची कृपा

तुला : व्यापारात मोठा लाभ होईल. कुटुंबातील जबाबदार व्यक्तीची शाबासकी मिळेल. आत्मविश्वास वाढेल.

वृश्चिक : अधिकाऱ्यांच्या भेटीने मनातील संशय दूर होतील. नात्यात शांतता टिकून राहील. जुने मित्र आणि नातेवाईकांची भेट होईल.

धनु : ऑफिसमध्ये सहकाऱ्यांची मदत मिळेल. नियमांचे पालन करावे लागेल. अनुभवी लोकांचा सल्ला फायदेशीर ठरेल.

TODAY HOROSCOPE in Marathi
खिशात पैसा खेळता राहणार, ऑफिसमध्ये प्रमोशन मिळणार; ५ राशींच्या लोकांवर लक्ष्मी प्रसन्न होणार

मकर : आरोग्याबाबत काळजी घ्यावी लागेल. कामात सतर्क राहावे लागेल. खर्च वाढल्याने बजेट बिघडू शकते.

कुंभ : व्यवसायात सुधारणा होतील. कुटुंबातील प्रेम सामंजस्यपणा वाढेल. वादविवादापासून दूर राहावेत.

मीन : तुमच्यासहित कुटुंबातील लोकांना अफवांपासून दूर ठेवावे. उधार दिलेले पैसे पु्न्हा मिळतील. आरोग्याबाबत सजग राहावे लागेल.

Disclaimer : लेखातील माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित आहे. या लेखाच्या आधारे निर्णय घेण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com