

डोंबिवलीत कोर्ट मॅरेजनंतर तरुणी बेपत्ता
आंतरजातीय विवाहाला कुटुंबीयांचा विरोध
प्रेमविवाहानंतर पत्नी गायब झाल्याने तरुण चिंते तक्रार
मानपाडा पोलिसांकडून तपास सुरू
पुरोगामी महाराष्ट्रात आजही जातीय मानसिकता संपलेली नसल्याचे धक्कादायक वास्तव पुन्हा एकदा समोर आले आहे. मागसवर्गीय समाजाच्या तरुणासोबत प्रेमविवाह करणाऱ्या तरुणीला तिच्याच आई-वडिलांनी हळदीच्या दिवशी गायब केल्याचा धक्कादायक प्रकार डोंबिवलीत उघडकीस आला आहे.
८ वर्षांच्या प्रेमसंबंधानंतर कोर्टात विवाह केलेल्या तरुणाची पत्नी आणि तिचे कुटुंबीय अचानक बेपत्ता झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी तरुणाने मानपाडा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिस पुढील तपास करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, डोंबिवलीतील ओंकार बनसोडे आणि शिवानी किंगरे यांचे गेल्या आठ वर्षांपासून प्रेमसंबंध होते. दोघांनी काही दिवसांपूर्वी कल्याण न्यायालयात विवाह नोंदणी करून लग्न केले होते. मात्र शिवानीच्या कुटुंबीयांचा या विवाहाला सुरुवातीला विरोध होता. ओंकार हा वेगळ्या समाजातील असल्याने कुटुंबीय नाराज असल्याचे सांगितले जाते.
कोर्ट मॅरेजची माहिती मिळाल्यानंतर शिवानीच्या कुटुंबीयांनी विवाहाला संमती दर्शविल्याचे ओंकारचे म्हणणे आहे. तसेच सामाजिक पद्धतीने पुन्हा लग्न लावून देण्याचे आश्वासन देत दोन्ही कुटुंबीयांनी डोंबिवलीतील एका हॉलची पाहणीही केली. हॉलचे आगाऊ पैसे ओंकार यांनी भरल्याचे सांगण्यात येत आहे.
लग्न काही दिवसांवर असताना अचानक शिवानीच्या आई-वडिलांनी तिला घेऊन गेले. शिवानी आणि तिचे संपूर्ण कुटुंब अचानक बेपत्ता झाल्यामुळे ओंकारला मोठा धक्का बसला. या घटनेची सध्या डोंबिवलीत चर्चा होत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.