Kangana Ranaut: कंगना रणौत यांनी खरंच गुपचूप लग्न केलं? स्वत:च सोशल मीडियावर पोस्ट करत सगळंच सांगितलं

Kangana Ranaut: मंगळसूत्र आणि हिरव्या बांगड्यांमध्ये दिसलेल्या कंगना रणौत यांच्या व्हायरल फोटोंमुळे लग्नाच्या चर्चा रंगल्या होत्या. अखेर अभिनेत्रीने सोशल मीडियावर याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे.
Kangana Ranaut
Kangana RanautSaam Tv
Published On

Kangana Ranaut: बॉलिवूड अभिनेत्री आणि खासदार कंगना रणौत सध्या त्यांच्या व्हायरल फोटो आणि व्हिडिओंमुळे चर्चेत आल्या आहेत. गळ्यात मंगळसूत्र, हातात हिरव्या बांगड्या कपाळाला लाल टिकली आणि पारंपरिक लूकमध्ये दिसल्यानंतर सोशल मीडियावर कंगना यांनी गुपचूप लग्न केल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. मात्र अखेर अभिनेत्रीने स्वतः पुढे येत या सर्व अफवांवर प्रतिक्रिया दिली आहे.

काही दिवसांपूर्वी कंगना यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. या व्हिडिओमध्ये विवाहित महिलेच्या लूकमध्ये कंगना दिसत होत्या. त्यामुळे अनेक चाहत्यांनी “कंगना यांनी लग्न केलं का?” असा प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. सोशल मीडियावर त्यांच्या लग्नाच्या चर्चांनी जोर धरल्यानंतर अभिनेत्रीने इंस्टाग्राम स्टोरी पोस्ट करुन याबाबत स्पष्टीकरण दिलं.

कंगना यांनी एका बातमीचा फोटो पोस्ट करत लिहिले, "मी दररोज शूटिंग करत आहे. मी माझ्या भूमिकेच्या मेकअपमध्ये असताना कुणीतरी माझा हा एक सहजसुंदर (random) फोटो काढला आणि आता मला खूप फोन येत आहेत. पण एका विवाहित स्त्रीच्या लूकबद्दल एवढी मोठी गोष्ट घडावी? यात एवढं काय विशेष आहे? कलाकार सर्व प्रकारच्या भूमिका साकारतात. मी वचन देते, मी गुपचूप लग्न करणार नाही."

Kangana Ranaut
Anupriya Goenka: प्रसिद्ध अभिनेत्रीच्या वक्तव्यानं खळबळ; वेश्याव्यवसायाला म्हटलं 'सोशल सर्व्हिस'

दरम्यान, कंगना यांचा हा लूक नेमका कोणत्या चित्रपटासाठी आहे. याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र सोशल मीडियावर हा लूक तनू वेड्स मनूच्या तिसऱ्या भागाशी किंवा क्विनच्या सिक्वेलशी संबंधित असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

Kangana Ranaut
Deool Band 2 Collection: बॉक्स ऑफिसवर दुमदुमला स्वामी समर्थांचा जयघोष; 'देऊळ बंद २'ची पहिल्याच दिवशी जोरदार कमाई

राजकारणात सक्रिय झाल्यानंतर कंगना काही काळ चित्रपटांपासून दूर होत्या. त्यांचा शेवटचा चित्रपट ‘इमर्जन्सी’ होता. आता त्या पुन्हा मोठ्या पडद्यावर परतणार असल्याने चाहतेही उत्सुक आहेत. लवकरच त्या ‘भारत भाग्य विधाता’ या चित्रपटात दिसणार असून हा चित्रपट १२ जून रोजी प्रदर्शित होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com