धक्कादायक! धावत्या ट्रेनमधून तरुणाने वाशीच्या खाडीत उडी मारली

vashi shocking news : धावत्या ट्रेनमधून तरुणाने वाशीच्या खाडीत उडी मारल्याची घटना घडली. या घटनेने लोकल ट्रेनमध्ये एकच खळबळ उडाली.
vashi news
vashi shocking newsSaam tv
Published On
Summary

नवी मुंबईच्या वाशीत घडली धक्कादायक घटना

प्रवाशाने धावत्या ट्रेनमधून मारली खाडीत उडी

मच्छिमारांनी वाचवला प्रवाशाचा जीव

नवी मुंबईच्या वाशीमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. हार्बर मार्गावर धावणाऱ्या लोकल ट्रेनमधून एकाने वाशीच्या खाडीत उडी मारली. तरुणाने गुरुवारी दुपारी वाशीच्या खाडीत उडी मारली. त्याने उडी मारल्यानंतर लोकलमधील प्रवाशांमध्ये खळबळ उडाली. त्यानंतर लोकलमधील प्रवाशांनी आरडाओरड केली. खाडीत उडी मारणाऱ्या तरुणाचा जीव मच्छीमारांनी जीवाची बाजी लावून वाचवला आहे.

लोकल ट्रेन सीएसएमटीवरून पनवेलच्या दिशेने निघाली होती. या ट्रेनमध्ये भारत शिवराम फुळमाळी नावाचा तरुण होता. या ट्रेनमध्ये ३८ वर्षीय भारतने अचानक ट्रेनमधून वाशीच्या खाडीत उडी मारली. भारतने वाशीच्या खाडीत उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता.

vashi news
Gold and Silver : सर्वसामान्यांसाठी खुशखबर! सोने-चांदीचे भाव आणखी कोसळणार? केंद्र सरकारने घेतला महत्वाचा निर्णय

उडी मारल्यानंतर खाडी किनारी मच्छीमारी करण्यासाठी आलेल्या नागरिकांनी भारतचे प्राण वाचवले. दुपारच्या सुमारास भारतने उडी मारल्यानंतर खाडी किनारी एकच खळबळ उडाली होती. उडी मारल्यानंतर मच्छिमारांनी खाडीत होडी नेत त्याचा शोध घेतला. मच्छिमारांनी भारतला जिवंत पाण्यातून बाहेर काढले. भारतने आत्महत्या करण्याचा प्रयत्न का केला, याचे कारण अद्याप समोर आलेले नाही.

vashi news
कोळसा खाणीत भीषण स्फोट; 10 मजुरांचा मृत्यू, अनेकांच्या संसाराची राखरांगोळी

प्राथमिक माहितीनुसार, भारत फुलमाळीच्या खिशात ओळखपत्र देखील आढळले. भारत हा पोलीस मित्र देखील आहे. भारत हा अहिल्यानगरच्या पार्थडी तालुक्यातील आंबिकानगरचा रहिवासी असल्याचं समोर आलं आहे. तो मुंबईत नेमका कुठे राहत होता, याची माहिती समोर आलेली नाही. पोलिसांच्या चौकशीनंतर भारत टोकाचं निर्णय का घेता होता, हे समोर येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com