कोळसा खाणीत भीषण स्फोट; 10 मजुरांचा मृत्यू, अनेकांच्या संसाराची राखरांगोळी

meghalaya Massive Explosion : मेघालयात कोळसा खाणीत भीषण स्फोट झाल्याची घटना घडली. या स्फोटात 10 मजुरांचा मृत्यू झाला आहे.
Massive Explosion
meghalaya Massive ExplosionSaam tv
Published On
Summary

मेघालयातील ताशखाईमध्ये कोळसा खाणीत स्फोट

स्फोटात १० मजुरांचा मृत्यू

स्फोटाची माहिती मिळताच पोलिसांची घटनास्थळी धाव

मेघालयातील ताशखाई भागातील एका कोळशाच्या खाणीत भीषण स्फोट झाल्याची घटना घडली आहे. या स्फोटात कमीत कमी १० मजुरांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या स्फोटाने परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

Massive Explosion
मी जातपात मानत नाही, माळी समाजाचा उल्लेख; अजितदादांनी मृत्यूआधी कॉलवर नाव घेतलेल्या नेत्याने सगळं काही सांगितलं

मिळालेल्या माहितीनुसार, ताशखाईच्या कोळसा खाणीत अचानक मोठा स्फोट झाला. या स्फोटावेळी खाणीत १० हून अधिक मजूर काम करत होते. स्फोट झाल्यानंतर मजुरांना बाहेर काढण्याआधी काहींची प्राणज्योत मालवली. बहुतांश मृत मजूर आसाममधील होते, असा दावा करण्यात येत आहे. परंतु प्रशासनाने याबाबत दुजोरा दिलेला नाही.

स्थानिक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत मजुरांपैकी एक मजूर आसामच्या कटिगारा भागातील बिहारा गावात राहणारा होता. खाणीत स्फोट झाल्याची माहिती मिळताच पोलीस आणि बचाव पथक मदतीला धावलं. खाणीत आणखी कोणी अडकलं आहे का, याचा तपास सर्च ऑपरेशनच्या माध्यमातून करण्यात येत आहे.

Massive Explosion
राष्ट्रवादीचं विलिनीकरण होणार की लांबणार? शरद पवारांच्या वक्तव्यानंतर नवा ट्विस्ट, VIDEO

प्रशासनाने कोळसा खाणीला वेढा घातला आहे. कोळसा खाणीत नेमका स्फोट कसा झाला, याचा तपास करण्यात येत आहे. प्राथमिक माहितीनुसार, खाणीत गॅस गळतीमुळे स्फोट झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तपासानंतर नेमका कशामुळे स्फोट झाला, हे स्पष्ट होणार आहे.

Massive Explosion
Thursday Horoscope : देवाच्या भक्तीत मग्न व्हाल; ५ राशींच्या लोकांचे नशीब पालटणार

स्फोटानंतर मजुरांची सुरक्षा आणि अनधिकृत खाणीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. या स्फोटाचा तपास करून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असं आश्वासन प्रशासनाने दिलं आहे. मृतांच्या नातेवाईकांना आर्थिक मदतीचे आश्वासन प्रशासनाने दिले आहे. खाणीत १० मजुरांच्या मृत्यूने त्यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. स्फोटामुळे अनेकांच्या संसाराची राखरांगोळी झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com