

अजित पवारांच्या शेवटच्या कॉलची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल
दिगंबर दुर्गाडे यांनी ऑडिओ क्लिपबाबत पहिली प्रतिक्रिया दिली
मी जातपात मानत नाही, असे अजित पवार शेवटच्या कॉलमध्ये बोलत होते.
सागर आव्हाड, साम टीव्ही
पुणे : अजित पवारांच्या मृत्यूनंतर त्यांचा शेवटचा कॉल सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अजित पवार अपघाताआधी देखील कार्यकर्त्यांशी बोलत होते. अजित पवार कार्यकर्त्याशी निवडणुकीच्या तिकीटाविषयी बोलत होते. या संभाषणात दिगंबर दुर्गाडे यांच्या नावाचा उल्लेख केला होता. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दिगंबर दुर्गाडे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली.
अजित पवारांच्या निधनाने महाराष्ट्रासह राष्ट्रवादी काँग्रेसवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. अजित पवारांचे अनेक व्हिडिओ आणि भाषणे सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अजितदादांनी अपघाताआधी एका कार्यकर्त्याशी संभाषण केलं होतं. अजित पवार यांनी शेवटच्या कॉलवर नाव घेतलेले दिगंबर दुर्गाडे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
दिगंबर दुर्गाडे म्हणाले, 'अजितदादांचे ती ऑडिओ क्लिप जिल्हा परिषद पंचायत आणि समिती निवडणुकीच्या प्रचारातली आहे. कार्यकर्त्याला समजावून सांगताना, मी जातपात मानत नाही. हेच दादांना त्यातून सांगायचं आहे. राज ठाकरे सारखा नेता सुद्धा म्हणतो की, अजित पवार यांच्या माझ्यात काही मतभेद असतील, मात्र हा जातपात मांडणारा माणूस नाही'.
'अजितदादांनी 1997 साली पहिल्यांदा जिल्हा परिषदेचे तिकीट मला दिलं होतं. आता जाताना सुद्धा माझ्या मुलीला तिकीट दिलं आहे. दादांनी शेवटचे हे तिकीट जिल्ह्याला नव्हे, तर महाराष्ट्राला दिले आहे. दादांना खरी श्रद्धांजली म्हणून हे निवडून आणावेत. दादा आता नाहीत. मात्र दादा सगळ्याच कार्यकर्त्यांना सोबत घेऊन जात होते, हे यातून सांगण्याचा प्रयत्न आहे. आम्ही सगळेजण तेच सगळे विसरून काम करू, असेही त्यांनी सांगितले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.