Gold and Silver
Gold and Silver Saam tv

Gold and Silver : सर्वसामान्यांसाठी खुशखबर! सोने-चांदीचे भाव आणखी कोसळणार? केंद्र सरकारने घेतला महत्वाचा निर्णय

Gold and Silver : सर्वसामान्यांसाठी खुशखबर हाती आली आहे. सोने-चांदीचे भाव आणखी कोसळण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारने महत्वाचा निर्णय घेतला आहे.
Published on
Summary

केंद्र सरकारने सोने-चांदी आयातीबाबत मोठा निर्णय घेतलाय

सीमाशुल्क निश्चित करण्यासाठी किंमत मर्यादा कमी करण्यात आलीये

आंतरराष्ट्रीय बाजारात दर वाढलेले असतानाही दिलासा मिळण्याची शक्यता

केंद्र सरकारने सर्वसामान्यांसाठी खुशखबर दिली आहे. केंद्र सरकारनं सोने आणि चांदीच्या आयात कमी केल्या आहेत. सीमाशुल्क निश्चित करण्यासाठी मर्यादेची किंमत करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर सोने आणि चांदीचे दर गगनाला भिडले आहेत. केंद्रीय प्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क मंडळाने अधिसूचनेनुसार शुल्क कपात लागू करण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे सोने आणि चांदीचे भाव कमी होण्याची शक्यता आहे.

सोन्याची मूळ आयत किंमत डॉलर ५० ने कमी करून डॉलर १५१८ प्रति १० ग्रमने कमी करण्यात आलीये. चांदीची किंमत देखील डॉलर ८०० पेक्षा जास्त कमी करून डॉलर २,६५७ प्रति किलोग्रॅम करण्यात आलीये. निर्दिष्ट शुल्क श्रेणी अंतर्गत सोने आणि चांदीला लागू होईल. जागतिक पातळीवर सोने आणि चांदीच्या किंती झाल्यास भारतातील सोने-चांदीचे दर कमी होतील.

Gold and Silver
कोण राज ठाकरे- वाकरे...; राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरील टीकेनंतर प्रफुल पटेल भडकले, VIDEO

याआधी आयात शुल्कामुळे किंमत कपात कमी झाली असती, परंतु ही कपात वाढेल. यामुळे सोने आणि चांदी स्वस्त होईल. आता यामध्ये दागिने, मौल्यवान धातूंपासून बनवलेल्या इतर वस्तू आणि पोस्ट, कुरिअरने आणलेल्या आयातींचा समावेश करण्यात आलेला नाही. चांदीची मूळ आयात किंमत २७ जानेवारी तर सोन्याची किंमत शेवटची २२ जानेवारी रोजी सुधारित करण्यात आली. दर पंधरा दिवसांनी आयात किंमतीचा आढावा घेण्यात येतो.

Gold and Silver
विमानाचा दरवाजा उघडलेला, निळी पँट घातलेला माणूस; सरपंचाने सांगितला अजितदादांच्या विमान अपघाताचा थरार

एकीकडे व्यापार तूट वाढण्याची चिंता निर्माण होऊ शकते. तसेच डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयावर आणखी दबाव येण्याची शक्यता आहे. आयात किंमतीमध्ये कपात झाल्याने येत्या आठवड्यात सोने आणि चांदीवरील आयात शुल्क वाढवण्याचा विचार करण्यात येऊ शकतो. सरकारने सर्व अपेक्षांच्या विरुद्ध कपात करण्याचा निर्णय घेतलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com