Vande Bharat Expressway : मध्यरात्री अडीच वाजता वंदे भारत एक्स्प्रेस रुळावर; रेल्वेचे वेळापत्रक विस्कळीत, प्रवाशांचे मेगाहाल

Vande Bharat Express Derails Pune : पुण्याजवळ वंदे भारत एक्स्प्रेस रुळावरून घसरल्यानंतर रात्री अडीच वाजता ट्रेन पुन्हा रुळावर आणण्यात यश आले.
Vande Bharat Express Derails Pune
Vande Bharat Express Derails Puneसाम टीव्ही मराठी
Published On

Vande Bharat Express derailment Pune latest update : पुण्यात रुळावरून घसरलेली वंदे भारत एक्स्प्रेस (Vande Bharat Express) अखेर रात्री अडीच वाजताच्या सुमारास पुन्हा रुळावर आणण्यात रेल्वे प्रशासनाला यश आले. सोमवारी रात्री सोलापूरकडे जाणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसचे ३ डब्बे पुण्यात रूळावरून घसरले होते. त्यामुळे रेल्वे वेळापत्रक कोलमडले होते. आजही अनेक गाड्या उशिराने धावत आहेत. त्यामुळे प्रवाशांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागत आहे.

नेमकी घटना काय?

सोमवारी रात्री पुण्याजवळ वंदे भारत एक्स्प्रेसचे चाक रुळावरून घसरल्याने मोठी खळबळ उडाली होती. या अपघातामुळे पुणे-मुंबई मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. रेल्वे कर्मचाऱ्यांनी युद्धपातळीवर काम करून रात्री साधारण अडीच ते तीनच्या सुमारास ही ट्रेन पुन्हा रुळावर आणली.

रेल्वे वेळापत्रकावर परिणाम (Railway Schedule Impact)

डेक्कन क्वीन (Deccan Queen) आणि प्रगती एक्स्प्रेस (Pragati Express) आज सकाळी १५ ते २० मिनिटे उशिराने धावत आहेत. रात्री अनेक गाड्यांना कर्जत (Karjat), लोणावळा (Lonavala) आणि खडकी (Khadki) स्थानकांवर दोन ते तीन तास रोखून धरावे लागले होते. इतर लांब पल्ल्याच्या गाड्यांचे वेळापत्रकही यामुळे 'रिशेड्युल' (Rescheduled) करावे लागले आहे.

Vande Bharat Express Derails Pune
तापमानाचा भडका, राज्यात होरपळ; नागपुरात उष्मघाताचे 13 बळी? आज कोणत्या जिल्ह्याला इशारा?

पुण्यात प्रवाशांचा खोळंबा :

अचानक झालेल्या या बदलामुळे प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. मध्यरात्री स्थानकांवर गाड्या थांबून राहिल्याने ज्येष्ठ नागरिक आणि मुलांचे हाल झाले. रेल्वे प्रशासनाने आता परिस्थिती नियंत्रणात असून इतर गाड्या वेळेवर धावत असल्याचा दावा केला असला तरी मुख्य गाड्यांच्या विलंबामुळे प्रवाशांमध्ये नाराजी आहे.

Vande Bharat Express Derails Pune
४ गर्लफ्रेंड, दारूचं व्यसन अन् १२ पानाची सुसाइड नोट; साखरपुड्यानंतर इंजिनीअरनं सरड्यासारखा रंग बदलला, २६ वर्षाच्या तरुणीची आत्महत्या

रेल्वे प्रवाशांचे हाल :

रेल्वे स्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी (Passenger Rush) झाली आहे. अनेक प्रवाशांना प्लॅटफॉर्मवरच बसून किंवा झोपून गाडीची प्रतीक्षा करावी लागत आहे. लहान मुले आणि वृद्ध प्रवाशांचे यामुळे मोठे हाल होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. रेल्वे प्रशासनाकडून वाहतूक पूर्वपदावर आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

Vande Bharat Express Derails Pune
मोठी बातमी! मुंबईत भाजपला जोरदार धक्का; दिग्गज नेत्यांसह शेकडो कार्यकर्त्यांचा शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com