४ गर्लफ्रेंड, दारूचं व्यसन अन् १२ पानाची सुसाइड नोट; साखरपुड्यानंतर इंजिनीअरनं सरड्यासारखा रंग बदलला, २६ वर्षाच्या तरुणीची आत्महत्या

engagement dispute : 26 वर्षीय तरुणीने साखरपुड्यानंतर होणाऱ्या नवऱ्याच्या वागणुकीमुळे आणि फसवणुकीमुळे आत्महत्या केली. 12 पानांची चिठ्ठी लिहून तिने धक्कादायक खुलासे केले असून पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे.
Crime
Crime Saam tv
Published On

साखरपुड्यानंतर होणाऱ्या नवऱ्याचे एक एक प्रताप समोर आले, त्यामुळे २६ वर्षाच्या तरूणीचा संयम सुटला अन् तिने टोकाचे पाऊल उचलले. लग्नाआधीच नवऱ्याच्या ४-४ गर्लफ्रेंड आणि दारूचं व्यसनाचे सत्य समोर आले, त्यामुळे खचलेल्या तरूणीने १२ पानांची सुसाइड नोट लिहून आत्महत्या केली. मृत तरूणीचे नाव रेहाना असे आहे, तर आरोपीचे नाव शहाजहान असे आहे. ही घटना आंध्र प्रदेशातील कडप्पा जिल्ह्यातील आहे.

साखरपुड्यानंतर शहाजहान याचे वागणे अचानक बदलले. तो रेहाना हिच्यावर लग्न मोडण्यासाठी वारंवार दबाव टाकत होता. मृत रेहाना हिने नुकतेच एमएससी पूर्ण केले होते. तर शाहजान हा बंगळुरूमध्ये टेक इंजिनीअर म्हणून काम करत आहे. १५ फेब्रुवारी रोजी रेहाना आणि शहाजहान यांचा साखरपुडा झाला होता. ऑगस्ट महिन्यात दोघांचे लग्न होणार होते. त्यांच्यामध्ये सुरूवातीला सर्व काही व्यवस्थित होते. पण काही दिवसानंतर खटके उडायला सुरूवात झाली. शहाजहान याचे वागणं बदलले. तो रेहानावर लग्न मोडण्यासाठी दबाव टाकू लागला.

Crime
महाराष्ट्र बँकेवर दिवसाढवळ्या दरोडा; १५ मिनिटांत ६ कोटींच्या सोन्यासह रोकड लंपास

पोलिसांच्या म्हणण्यानुसार, रेहानाने १२ पानांची एक चिठ्ठी लिहून आत्महत्या केली. रेहाना हिने आपल्या शेवटच्या चिठ्ठीत मृत्यूचे कारण सांगितले. शहाजहान तिला सांगायचा की त्याच्या मनात तिच्याबद्दल कोणतीही आपुलकी आणि भावना नाहीत. रेहाना त्याला अजिबात आवडत नाही. शहाजहानच्या यापूर्वी आणखी चार प्रेयसी होत्या. दरम्यान, रेहाना गेल्या काही दिवसांपासून नैराश्यात गेली होती. त्यातूनच बुधवारी कडप्पाा येथील पटेल स्ट्रीटवरील राहत्या घरी मृतावस्थेत आढळली.

पोलिसांनी सांगितले की, रेहानाचा मृतदेह पोस्टमार्टम रिपोर्टनुसार कडप्पामधील RIMS येथे पाठवण्यात आला आहे. रेहानाच्या वडिलांनी दाखल केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला. पोलिसांनी शाहजहान आणि त्याचे आई-वडील, एम. वीराया आणि एम. वाहिदा यांना आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली अटक केली. आरोपींना स्थानिक न्यायालयात हजर करून न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले.

Crime
Mumbai Pune : मुंबई-पुणे प्रवास १ तासाने कमी होणार, ‘मिसिंग लिंक’ १ मेपासून सुरू

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com