Maharashtra Heatwave Update News : तापमानाचा भडका उडाल्याने राज्यात होरपळ वाढली आहे. विदर्भासह महाराष्ट्रात सूर्य अक्षरक्ष: आग ओकतोय. कमाल तापमानाचा पारा नवे उच्चांक प्रस्थापित करत आहे. अमरावती, यवतमाळसह विदर्भात उष्णतेची लाट उसळल्याने जमीन भाजून निघत आहे.
नागपुरात उष्मघाताचे 13 बळी?
नागपूरकर अक्षरशः उष्णतेच्या तडाख्यात होरपळत आहेत. नागपूर शहरात गेल्या १० दिवसांत शहरात तब्बल १३ अनोळखी व्यक्तींचे मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. उष्माघाताचा संशय व्यक्त केला जात असला तरी ‘डेथ ऑडिट’नंतरच नेमके कारण स्पष्ट होणार आहे. ४१ ते ४५ अंश सेल्सिअस तापमानामुळे शहर जणू ‘आगीची भट्टी’ बनले आहे... दुपारीच नव्हे तर रात्रीही उष्ण झळा जाणवत आहेत. मेयो आणि मेडिकल रुग्णालयात आलेल्या मृतदेहांमध्ये बहुतेक ३२ ते ५५ वयोगटातील पुरुषांचा समावेश आहे. प्रशासनाचा इशारा १२ ते ४ या वेळेत घराबाहेर पडणे टाळा, भरपूर पाणी प्या असे आवाहन केले जात आहे. तर मनपाकडून बेघरांसाठी निवारा केंद्र आणि शीतगृहांची व्यवस्था करण्यात आली आहे.
या वाढत्या तापमानाने पश्चिम विदर्भातील अकोला, अमरावती आणि यवतमाळ येथे उच्चांक गाठला. अशातच उष्माघाताचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळू लागलेय. पश्चिम विदर्भात १ मार्च ते २७ एप्रिल या कालावधीत जवळपास ७३ उष्मघातांच्या रुग्णांची नोंद झाली. मात्र, एकट्या अकोल्यात या रुग्णांची संख्या ७२ वर असल्याची धक्कादायक माहिती समोर आली. या सर्वांवर उपचार होतोय, त्यापैकी 2 रुग्ण अद्यापही ICU मध्ये दाखल आहे. तर 54 रुग्णांना डिस्चार्ज मिळालाये.
पश्चिम विदर्भातील कशी उष्माघातांच्या रुग्णांची संख्या जिल्हानिहाय.
जिल्हा - रुग्ण संख्या - ICU दाखल - डिस्चार्ज.
1) अकोला : 72 : 2 : 54
2) वाशिम : 1 : 00 : 1
3) बुलडाणा : 00 : 00 : 00
4) यवतमाळ : 00 : 00 : 00
5) अमरावती : 00 : 00 : 00
एकूण : 74 : 2 : 55 रुग्ण.
अकोल्यात उष्माघाताचा एकाचा बळी?
अकोल्यात एका व्यक्तीचा मृतदेह रिक्षात आढळला होता, त्याचा उष्माघाताने मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मात्र वैद्यकीय अहवालानंतर मृत्यू मागील खरं कारण समोर येईल, आरोप उपसंचालकांच म्हणणं.
कालं विदर्भातील जिल्हानिहाय कसं होतय तापमान....
अकोला - 46.3, अमरावती - 46.6, बुलढाणा - 43.6, वाशिम - 44.2, यवतमाळ - 45.2, भंडारा - 42, ब्रह्मपुरी - 44.4, चंद्रपूर - 45.2, गडचिरोली - 43.2, गोंदिया - 41, नागपूर - 45, वर्धा - 46.5,
तर जगातील सर्वाधिक उष्ण शहर म्हणून ओळख असलेल्या एकट्या अकोल्यातील मागील काही दिवसातील तापमान.
21 एप्रिल : 43.6 अंश सेल्सियस.
22 एप्रिल : 43.7 अंश सेल्सियस.
23 एप्रिल : 44.3 अंश सेल्सियस.
24 एप्रिल : 45 अंश सेल्सियस.
25 एप्रिल : 45.6 अंश सेल्सियस.
26 एप्रिल : 46.9 अंश सेल्सियस.
27 एप्रिल : 46.3 अंश सेल्सियस.
उष्णतेच्या लाटेचा इशारा (येलो अलर्ट) : ठाणे, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, अकोला, अमरावती.
वादळी पावसाचा इशारा (येलो अलर्ट) : नागपूर, वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली.
उन्हाचा चटका अधिक असलेली ठिकाणे : अकोला ४६.९, अमरावती ४६.८, वर्धा ४६.४, यवतमाळ ४६, नागपूर ४५.४, चंद्रपूर ४५.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.