मुंबई-पुणे प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; डेक्कन क्वीनसह २२ गाड्या आठवडाभरासाठी रद्द, संपूर्ण यादी एका क्लिकवर

Mumbai-Pune travel: खंडाळा घाटात दरड कोसळल्यामुळे मध्य रेल्वेने मुंबई-पुणे मार्गावरील डेक्कन क्वीनसह २२ गाड्या १० ते १७ जुलैदरम्यान रद्द केल्या आहेत. प्रवाशांना तिकिटांचा पूर्ण परतावा मिळणार आहे.
PUNE MUMBAI TRAINS CANCELLED AFTER LANDSLIDE | DECCAN QUEEN, INTERCITY & DECCAN EXPRESS AFFECTED
PUNE MUMBAI TRAINS CANCELLED AFTER LANDSLIDE | DECCAN QUEEN, INTERCITY & DECCAN EXPRESS AFFECTEDSaam Tv
Published On

दिलीप कांबळे, मावळ प्रतिनिधी

Mumbai-Pune Train Update: मुंबई-पुणे रेल्वे प्रवाशांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. मध्य रेल्वेच्या कर्जत-लोणावळा सेक्शनमधील खंडाळा ते मंकीहिल दरम्यान ठाकूरवाडी आणि मंकी हिल या आज मोठ्या प्रमाणावर भूस्खलन झाले. यामुळे सुरक्षेचा उपाय म्हणून रेल्वे प्रशासनाने या मार्गावरील अप (UP) आणि डाऊन (DN) अशा दोन्ही लाईन्स वाहतुकीसाठी तातडीने बंद केल्या आहेत. (Deccan Queen cancelled latest update, Mumbai Pune train cancellations July 2026)

निसर्गाच्या या प्रकोपामुळे मध्य रेल्वेने १० जुलै ते १७ जुलै या काळात आठवडाभराच्या कालावधीसाठी मुंबई-पुणे दरम्यान धावणाऱ्या डेक्कन क्वीनसह एकूण २२ प्रमुख एक्सप्रेस गाड्या रद्द करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. प्रवाशांची सुरक्षितता महत्त्वाची असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. रेल्वे प्रशासन युद्धपातळीवर ढिगारा उपसण्याचे आणि मार्ग मोकळा करण्याचे काम करत आहे.

या गाड्या राहतील रद्द

१२१२३/१२१२४ डेक्कन क्वीन

१२१२७/१२१२८ इंटरसिटी एक्सप्रेस

११००७/११००८ डेक्कन एक्सप्रेस

१७४११/१७४१२ कर्नाटक एक्सप्रेस आणि

२२१५७/२२१५८ चेन्नई मेल

या प्रमुख गाड्या १० ते १७ जुलै दरम्यान पूर्णपणे रद्द करण्यात आल्या आहेत.

याशिवाय इंदूर एक्सप्रेस (२२९४३/२२९४४), हैदराबाद एक्सप्रेस (२२७३१/२२७३२) आणि अजमेर एक्सप्रेस (२०४९५/२०४९६) या इतर मार्गांवरील गाड्याही विविध तारखांना रद्द राहतील.

PUNE MUMBAI TRAINS CANCELLED AFTER LANDSLIDE | DECCAN QUEEN, INTERCITY & DECCAN EXPRESS AFFECTED
IMD Weather Update: १३ राज्यात अतिमुसळधार पावसाचा इशारा, महाराष्ट्रात शुक्रवारी कसं असेल हवामान, पाहा अपडेट

सिंहगड आणि प्रगती एक्सप्रेस सुरू

दरम्यान, या संपूर्ण गोंधळात पुणे-मुंबई प्रवास करणाऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. सिंहगड एक्सप्रेस आणि प्रगती एक्सप्रेस आपल्या नियोजित वेळेनुसार धावणार आहेत, याची प्रवाशांनी नोंद घ्यावी, असे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

तिकिटांचा पूर्ण रिफंड मिळणार

रेल्वे स्थानकांवर प्रवाशांच्या माहितीसाठी नोटीस बोर्ड आणि अनाउन्समेंट सिस्टीम (PA System) द्वारे सतत सूचना दिल्या जात आहेत. तसेच इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातूनही अपडेट्स दिले जात आहेत. रद्द झालेल्या सर्व गाड्यांच्या तिकिटांचा पूर्ण परतावा (Full Refund) प्रवाशांना मिळणार आहे.

PUNE MUMBAI TRAINS CANCELLED AFTER LANDSLIDE | DECCAN QUEEN, INTERCITY & DECCAN EXPRESS AFFECTED
Maharashtra politics : ठाकरेंनंतर पवारांना धक्का? ६ खासदार अस्वस्थ, माजी मुख्यमंत्र्यांच्या दाव्याने खळबळ; नेमकं काय म्हणाले?

प्रवाशांना पर्यायी मार्गाचा सल्ला

पावसाळ्यात खंडाळा घाटात दरड कोसळण्याच्या घटना नव्या नसल्या तरी सुरक्षेबाबत कोणतीही तडजोड केली जाऊ शकत नाही. त्यामुळे प्रवाशांनी घराबाहेर पडण्यापूर्वी १३९ या क्रमांकावर संपर्क साधून किंवा IRCTC App वर आपल्या गाडीचे स्टेटस तपासूनच प्रवास करावा. तसेच, रेल्वे सेवा विस्कळीत झाल्यामुळे पुणे-मुंबई प्रवासासाठी प्रवाशांना आता NH-48 (मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्ग) या पर्यायी रस्त्याचा वापर करावा लागणार आहे. प्रशासनाने प्रवाशांना या कठीण प्रसंगात संयम राखण्याचे आणि सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे..

PUNE MUMBAI TRAINS CANCELLED AFTER LANDSLIDE | DECCAN QUEEN, INTERCITY & DECCAN EXPRESS AFFECTED
Crime : भयानक! १९ वर्षांच्या पत्नीला हेल्मेटनं ठेचून मारलं, लग्नानंतर ४ महिन्यात नेमकं काय झालं?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com