Mumbai : पवईत भयंकर घडलं! १९ वर्षीय बॉयफ्रेंडने आयुष्य संपवले, नंतर गर्लफ्रेंडनेही गळफास घेतला; कारण...

Powai Mumbai : मुंबईतील पवईमध्ये एका तरुणाने गळफास घेत आत्महत्या केली. यानंतर त्याच्या गर्लफ्रेंडनेही आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने तरुणीचा जीव वाचला.
crime
crimex
Published On
Summary
  • पवईत १९ वर्षीय तरुणाची आत्महत्या

  • गर्लफ्रेंडनेही केला आत्महत्येचा प्रयत्न

  • पोलिसांमुळे वाचले तरुणीचे प्राण

Powai : मुंबईतील पवईमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पवईमध्ये एका १९ वर्षीय मुलाने आत्महत्या केली. त्याने राहत्या घरात गळफास घेत स्वत:ला संपवले. ही घटना पवईतील महात्मा फुले नगर येथील रहिवासी असलेल्या तरुणाचा मृतदेह दुपारी अडीचच्या सुमारास त्याच्या घरात लटकलेल्या अवस्थेत आढळून आला.

तरुणाने आत्महत्या केल्याची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. तरुणाला तातडीने घाटकोपर पूर्व येथील राजावाडी रुग्णालयात नेण्यात आले, तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. यादरम्यान त्याच परिसरात एका तरुणीने अशाच प्रकारे गळफास घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचे पोलिसांना समजले. त्यांनी वेळेच त्या तरुणीचे प्राण वाचवले.

crime
BJP : ऑफिसमध्ये आढळला भाजप नगरसेवकाचा मृतदेह, गळफास घेत आयुष्य संपवलं; कारण...

आत्महत्या करणाऱ्या १९ वर्षीय तरुणाचे आणि आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या तरुणीचे कनेक्शन समोर आले आहे. प्राथमिक माहितीनुसार, ते दोघे प्रेमसंबंधात होते. दोघेही एकाच परिसरात राहत होते. तरुणाच्या मृत्यूनंतर त्याच्या नातेवाईकांनी तरुणीशी वाद घातला. तिला त्रास द्यायला सुरुवात केली, तिच्यावर अत्याचार केले.

crime
Sudan Mosque Attacked : मशिदीवर ड्रोन हल्ला, नमाज पठण करताना ७० हून अधिक जणांचा मृत्यू

बॉयफ्रेंडच्या नातेवाईकांनी दिलेल्या त्रासाला कंटाळून तरुणीने घरात स्वत:ला बंद करुन गळफास घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. पार्कसाईट पोलीस स्टेशनशी संलग्न बीट मार्शल पोलिस कॉन्स्टेबल ठोकल आणि बीट स्पेशल ससाणे यांनी याची माहिती मिळताच तातडीने कारवाई केली. त्यांनी जबरदस्तीने दरवाजा उघडून तरुणीचे प्राण वाचवले. तिला उपचारासाठी राजावाडी रुग्णालयात नेले. वेळेच पोलिसांनी हस्तक्षेप केल्याने तरुणीचा जीव वाचला.

crime
Singer Death : लोकप्रिय गायकाचे वयाच्या ५२ व्या वर्षी निधन, स्कूबा डायव्हिंग करताना अपघातात गमावला जीव

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com