BJP : ऑफिसमध्ये आढळला भाजप नगरसेवकाचा मृतदेह, गळफास घेत आयुष्य संपवलं; कारण...

Shocking : भाजप नगरसेवकाचा मृतदेह त्याच्याच ऑफिसमध्ये आढळला. नगरसेवकाने गळफास घेत आत्महत्या केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तपास सुरु केला आहे.
bjp councilor anil kumar death
bjp councilor anil kumar deathx
Published On
Summary
  • भाजप नगरसेवकाचा ऑफिसमध्ये मृतदेह आढळला.

  • प्राथमिक तपासात गळफास घेतल्याचे निदर्शनास आले.

  • स्थानिक पोलिसांनी या घटनेचा तपास सुरु केला आहे.

Shocking News : भारतीय जनता पक्षाच्या एका नगरसेवकाचा मृतदेह त्याच्याच ऑफिसमध्ये लटकत असल्याचे आढळून आले. आज सकाळी (२० सप्टेंबर) तिरुवनंतपुरममध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. प्राथमिक तपासात हा आत्महत्येचा संशयास्पद प्रकार असल्याचे मानले जात आहे. या प्रकरणामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

bjp councilor anil kumar death
Sudan Mosque Attacked : मशिदीवर ड्रोन हल्ला, नमाज पठण करताना ७० हून अधिक जणांचा मृत्यू

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तिरुवनंतपुरममधील तिरुमला वॉर्ड नगरसेवक के. अनिल कुमार यांचा मृतदेह सकाळी नऊच्या सुमारास आढळून आला. अनिल कुमार यांनी आत्महत्या केल्याचे सध्या म्हटले जात आहे. या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरु केला आहे. अनिल कुमार सकाळी त्यांच्या ऑफिसमध्ये शेवटचे दिसले होते आणि नंतर त्यांचा मृत्यू झाल्याचे स्थानिकांनी सांगितले आहे.

bjp councilor anil kumar death
Mumbai-Pune : मुंबई-पुणे इंटरसिटी एक्स्प्रेसमध्ये वृद्धाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

सूत्रांकडून मिळालेल्या वृत्तानुसार, अनिल कुमार हे एक सहकारी संस्था चालवत होते. मागील काही काळापासून ते आर्थिक अडचणींमुळे त्रस्त झाले होते. अनिल कुमार यांच्या मृतदेहाजवळ एक सुसाईड नोट सापडल्याचा दावा केला जात आहे. या नोटमध्ये भाजप नेत्यांच्या विरोधात भाष्य केल्याचे म्हटले जात आहे. पोलिसांनी सुसाईट नोटची पुष्टी केलेली नाही. पोलिसांनी चौकशी सुरु असल्याचे सांगितले आहे.

'अनिल कुमार हे सहकारी संस्थेच्या आर्थिक समस्यांमुळे चिंतेत होते. अनेक लोकांकडून घेतलेले कर्ज फेडण्यात ते अपयशी ठरले होते. कर्जामुळे ते मानसिक तणावाखाली होते. पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. लवकरच तथ्य स्पष्ट होईल अशी आशा आहे', असे वक्तव्य भाजपचे जिल्हाध्यक्ष व्ही.व्ही.राजेश यांनी केले आहे.

bjp councilor anil kumar death
Pune : कात्रज-कोंढवा रस्त्यासाठी महापालिकेने २०० कोटींची निधी वळवला, पुण्यातील तब्बल ८०० कामे रखडली

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com