
पुण्यातील कात्रज-कोंढवा रस्त्यासाठी महापालिकेने २०० कोटी रुपये निधी वळवले.
या कामामुळे पुणे शहरातील ८०० हून अधिक नागरी कामे रखडली आहेत.
प्रकल्पासाठी खासगी जमीन संपादित करण्यात यश न मिळाल्याने रस्त्याचे काम प्रलंबित आहे.
Pune : पुण्यातील कात्रज-कोंढवा रस्त्याच्या बांधकामासाठी २०० कोटी रुपयांचा निधी वळवण्यासाठी पुणे शहरातील ८०० हून अधिक प्रस्तावित नागरी कामे रखडली असल्याची माहिती समोर आली आहे. नागरी कामांमध्ये प्रामुख्याने नागरी सुविधांची दुरुस्ती, देखभालीची कामे असल्याचे म्हटले जात आहे. राजस सोसायटी ते खादी मशीन चौक मार्गे पिसोलीपर्यंत ३.५ किमी लांब आणि ८४ मीटर रुंद कात्रज-कोंढवा रस्ता बांधण्यासाटी २००८ मध्ये सुरुवात झाली होती. प्रकल्पासाठी खासगी जमीन संपादित करण्यात यश न मिळाल्याने हे काम प्रलंबित आहे, असे पुणे महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी सांगितले आहे.
पुणे शहराच्या रस्त्यांवरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी सोलापूर रस्ता, सातारा रस्ता आणि मुंबई रस्ता या महामार्गावरील वाहतूक वळवण्याची योजना काजत्र-कोंढवा रस्ता प्रकल्प आखण्यात आला होता. कात्रज-कोंढवा रोड अंतर्गत येणाऱ्या भागात वेगाने शहरीकरण होत आहे. यामुळे या भागामध्ये वाहतूकीचे प्रमाण वाढत आहे.
पुणे महानगरपालिकेला जमीन देणारे जमीन मालक फ्लोअर स्पेस इंडेक्स (एफएसआय) किंवा ट्रान्सफर डेव्हलपमेंट राईट्स (टीडीआर) यांच्याद्वारे भरपाई स्वीकारण्यास नकार देत आहेत. भरपाई ऐवजी ते रोख रक्कम मागत आहेत, असे नागरी संस्थेच्या प्रमुखांनी सांगितले आहे. जर प्रकल्पासाठी आवश्यक असलेली जमीन रोख भरपाईद्वारे संपादित करायची असेल, तर अंदाजे ८२९ कोटी रुपयांची आवश्यकता आहे, असे महापालिका आयुक्त म्हणाले.
५० मीटर रुंदीचा ३.५ किमीचा रस्ता प्रथम विकसित करण्याचा आणि नंतर ८४ मीटरपर्यंत रुंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. ५० मीटर रुंदी आणि ३.५ किमी लांबीच्या कात्रज-कोंढवा रस्त्यासाठी भूसंपादन करण्यासाठी २८० कोटी रुपये लागतील. यासाठी महापालिकेचे ५० कोटी रुपयांचे बजेट आहे. उरलेले २३० कोटी रुपये पुढील दीड महिन्यात उपलब्ध करुन द्यायचे आहेत. जेणेकरुन जून २०२५ पूर्ण होईल. आवश्यक निधी तात्काळ उपलब्ध करुन देणे आवश्यक असल्याने विविध प्रस्तावित नागरी कामांचे अर्थसंकल्पीय वाटप कात्रज-कोंढवा प्रकल्पासाठी जमीन संपादित करण्यासाठी २२२ कोटी रुपये उपलब्ध करून देण्यासाठी वळवले जात आहे, असे नवल किशोर राम यांनी म्हटले आहे.
पुण्यातील रस्ते, फूटपाथ आणि गटार दुरुस्तीसाठी देण्यात आलेला निधी महानगरपालिका प्रशासन कात्रज ते कोंढवा रस्ता तयार करण्यासाठी वापरणार आहे. इमारत विकास विभागाकडून देखील निधी या कामासाठी वळवाल जाणार आहे. 'कात्रज-कोंढवा रस्ता महत्त्वाचा आहे, पण त्याचे बांधकाम बराच काळ थांबले आहे. विशिष्ट रस्त्यांसाठी निधी देताना शहरातील इतर भागातील नागरी कामांवर परिणाम होणार नाही याची काळजी प्रशासनाने घ्यावी', असे राष्ट्रवादी नेते नीलेश निकम यांनी म्हटले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.