
सुदानच्या अल-फाशेर शहरात ड्रोन हल्ला
मशिदीवर आरएसएफने ड्रोन हल्ला केल्याची शक्यता
ड्रोन हल्ल्यात ७० हून अधिक जणांचा मृत्यू
सुदान देशातील उत्तर दारफुरची राजधानी असलेल्या अल-फाशेर शहरात मोठी हिंसक घटना घडली. एका निमलष्करी गटाने मशिदीमध्ये प्रार्थना करणाऱ्या ७० पेक्षा जास्त नागरिकांची हत्या करण्यात आली. हा हल्ला रॅपिड सपोर्ट फोर्सेस म्हणजेच आरएसएफने ड्रोनच्या मदतीने केल्याचे सुदान डॉक्टर्स नेटवर्क या स्थानिक संघटनेने सांगितले आहे. मृतांमध्ये लहान मुले आणि वृद्धांचा समावेश असल्याचे म्हटले जात आहे. ही घटना शुक्रवारी (१९ सप्टेंबर) पहाटे घडली आहे.
मशिदीमध्ये प्रार्थना करण्यासाठी गेलेल्या निरपराध नागरिकांवर झालेल्या हल्ल्याला सुदान डॉक्टर्स नेटवर्कने घृणास्पद गुन्हा असे म्हटले आहे. 'द रेसिसटेंस कमिटीज इन अल फ़शर' या संघटनेने काल (१९ सप्टेंबर) ड्रोन हल्ल्याचा एक व्हिडीओ पोस्ट केला. या व्हिडीओमध्ये मशिदीचे काही भाग ढिगाऱ्यात कोसळले असल्याचे आणि असंख्य मृतदेह विखुरलेले असल्याचे पाहायला मिळते. एपी वृत्तसंस्था स्वतंत्रपणे फुटेजची पडताळणी करू शकली नाही. द रेसिसटेंस कमिटीज इन अल फ़शर हा स्थानिक नागरिकांची आणि मानवाधिकार कार्यकर्त्यांची संघटना आहे.
एप्रिल २०२३ मध्ये सुदान देशात लष्कर आणि रॅपिड सपोर्ट फोर्सेस (आरएसएफ) यांच्यात सुरू झालेल्या संघर्षाचे रुपांतर आता मोठ्या यादवी युद्धात झाले आहे. गेल्या काही दिवसांत अल-फाशेर शहरात भीषण लढाई होत आहे. यादरम्यान मशिदीवर ड्रोन झाला. या मशिदीचे ठिकाण अजूनही स्पष्ट झालेले नसल्याचे म्हटले जात आहे.
जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार, यादवी युद्धात आतापर्यंत किमान ४०,००० लोकांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय १.२ कोटींपेक्षा जास्त नागरिकांना घर सोडून पळ काढावा लागला आहे. या लोकांपैकी अनेकजण निर्वासित छावण्यांमध्ये राहत आहे. हजारो कुटुंबे अजूनही सुरक्षिततेच्या शोधात आहेत. युद्धामुळे सुदानची परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.