Mumbai-Pune : मुंबई-पुणे इंटरसिटी एक्स्प्रेसमध्ये वृद्धाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

Karjat : कर्जत येथे मुंबई-पुणे इंटरसिटी एक्सप्रेसमध्ये ७० वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. त्यांना कर्जतच्या रुग्णालयात नेण्यात आले. तेव्हा डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
Mumbai Pune Intercity Express
Mumbai Pune Intercity Expressx
Published On

Mumbai Pune Intercity Express : मुंबई-पुणे इंटरसिटी एक्सप्रेसमध्ये एका ७० वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. ही घटना कर्जत रेल्वे स्थानकादरम्यान घडली आहे. या वृद्ध व्यक्तीचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचे म्हटले जात आहे. रेल्वे कर्मचारी, अधिकारी यांच्या निष्काळजीपणामुळे झाल्याचा आरोप एका सहप्रवाशाने केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवार (१९ सप्टेंबर रोजी) सकाळी कर्जत रेल्वे स्थानकावर पोहोचताच ट्रेन क्रमांक १२१२७ इंटरसिटी एक्सप्रेसमधून प्रवास करणारी ७० वर्षीय वृद्ध व्यक्ती कोच डी/९ मध्ये बेशुद्ध अवस्थेमध्ये आढळून आली. वृद्धाला कर्जत येथील सिव्हील हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. रुग्णालयातील डॉक्टराने वृद्धाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचे घोषित केले.

Mumbai Pune Intercity Express
Hardik Pandya : हार्दिक पंड्याचा भन्नाट कॅच अन् भारताचा निसटता विजय, मोठा उलटफेर थोडक्यात हुकला; पाहा थरारक VIDEO

७० वर्षीय वृद्ध व्यक्तीचे ओळख पटली आहे. त्यांचे नाव राजेश रामलाल शाह असे आहे. तो मुंबईतील ताडदेव येथील रहिवासी आहे. ते मुंबई-पुणे इंटरसिटी एक्सप्रेस ट्रेन क्रमांक १२१२७ मधून प्रवास करत होते. सकाळी ८.१६ वाजता ट्रेन कर्जतच्या प्लॅटफॉर्म क्रमांक १ वर येताच राजेश शाह बेशुद्ध अवस्थेत आढळून आले. सहप्रवाशांनी आरपीएफ आणि जीआरपी यांना माहिती दिली. त्यानंतर शाह यांना रुग्णालयात नेण्यात आले.

Mumbai Pune Intercity Express
Singer Death : लोकप्रिय गायकाचे वयाच्या ५२ व्या वर्षी निधन, स्कूबा डायव्हिंग करताना अपघातात गमावला जीव

राजेश शाह हे ट्रेन कर्जत रेल्वे स्थानकादरम्यान आली तेव्हा बेशुद्ध अवस्थेत होते. या घटनेदरम्यान आसपास अधिकारी उपस्थित नव्हते आणि घटनास्थळी रुग्णवाहिका किंवा डॉक्टरही उपलब्ध नव्हते. अधिकाऱ्यांची परिस्थिती हाताळण्यात निष्काळजीपणा केल्याचा आरोप एका सहप्रवाशाने केला आहे. या प्रकरणाचा तपास कर्जत येथील जीआरपीकडून सुरू आहे.

Mumbai Pune Intercity Express
Thane Metro : ठाणेकरांची वाहतूक कोंडीची कटकट सुटणार, ठाण्यात 'या' दिवशी धावणार मेट्रो

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com