Singer Death : लोकप्रिय गायकाचे वयाच्या ५२ व्या वर्षी निधन, स्कूबा डायव्हिंग करताना अपघातात गमावला जीव

Zubeen Garg Death : सिंगापूरमध्ये स्कूबा डायव्हिंग करत असताना लोकप्रिय गायक झुबिन गर्ग अपघातग्रस्त झाले. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले.
Zubeen Garg Dies In Scuba Diving Accident
Zubeen Garg Dies In Scuba Diving Accidentx
Published On
Summary
  • झुबिन गर्ग यांचे वयाच्या ५२ व्या वर्षी निधन

  • सिंगापूरमध्ये स्कूबा डायव्हिंग करताना झाला अपघात

  • झुबिन यांच्या निधनामुळे मनोरंजन विश्वात हळहळ

Zubeen Garg Dies In Scuba Diving Accident : मनोरंजन विश्वातून एक दु:खद बातमी समोर आली आहे. बॉलिवूडमधील अनेक प्रसिद्ध गाण्यांना आवाज देणारे प्रसिद्ध गायक झुबिन गर्ग यांचे वयाच्या ५२ व्या वर्षी निधन झाले आहे. त्यांच्या निधनाच्या बातमीने सर्वांना धक्का बसला आहे. सिंगापूरमध्ये स्कूबा डायव्हिंग करताना झुबिन गर्ग यांचे निधन झाल्याचे म्हटले जात आहे.

आसामचे मंत्री अशोक सिंघल यांनी झुबिन गर्ग यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. 'झुबिन यांच्या संगीतात, अनेक पिढ्यांना आनंद, सांत्वन आणि ओळख मिळाली. त्यांच्या जाण्याने कधीही भरून न येणारी पोकळी निर्माण झाली आहे. आसामने त्यांच्या सर्वात प्रिय पुत्रांपैकी एक गमावला आहे. भारताने एक सर्वोत्तम कलाकार गमावला आहे. त्यांच्या आत्माला शांती लाभो', असे अशोक सिंघल यांनी एक्सवर पोस्ट करत म्हटले आहे.

झुबिन गर्ग यांचा मृत्यू कसा झाला?

नॉर्थ ईस्ट न्यूजने दिलेल्या माहितीनुसार, झुबिन गर्ग हे सिंगापूरमध्ये स्कूबा डायव्हिंगचा आनंद घेत होते. अचानक ते समुद्रात पडले. त्यांना वाचवण्यात आले आणि रुग्णालयात दाखल करण्यात आले. स्थिती बिघडल्याने त्यांना आयसीयूमध्ये हलवण्यात आले. आयसीयूत उपचार सुरु असताना झुबिन गर्ग यांचे निधन झाले. आज (१९ सप्टेंबर) सिंगापूरमधील नॉर्थ ईस्ट फेस्टिव्हलमध्ये ते सादरीकरण करणार होते.

Zubeen Garg Dies In Scuba Diving Accident
Nanded : फिरायला गेले अन् घात झाला, फोटो काढण्याच्या नादात...; पालकांचा मन हेलावणारा आक्रोश

मेघालयामध्ये १९७२ मध्ये झुबिन गर्ग यांचा जन्म झाला. त्यांचे खरे नाव झुबिन बोरठाकूर असे होते. त्यांनी १९९० च्या दशकात त्यांनी झुबिन गर्ग हे स्टेज नाव स्वीकारले. २००६ मध्ये त्यांनी 'गँगस्टर' चित्रपटातील 'या अली' हे गाणे गायले. यामुळे त्यांना देशभरात प्रसिद्धी मिळाली. त्यांनी आसामी, बंगाली, हिंदी अशा अनेक भाषांमध्ये गाणी गायली आहेत. अनेक वर्षांपासून ते आसामचे सर्वाधिक कमाई करणारे गायक होते.

Zubeen Garg Dies In Scuba Diving Accident
Cricket : अष्टपैलू खेळाडूवर कोसळला दु:खाचा डोंगर, सामन्यादरम्यान झाले वडिलांचे निधन; VIDEO

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com