Nanded : फिरायला गेले अन् घात झाला, फोटो काढण्याच्या नादात...; पालकांचा मन हेलावणारा आक्रोश

Nanded News : फिरण्यासाठी गेलेल्या दोन अल्पवयीन तरुणांचा तलावामध्ये बुडून मृत्यू झाला. फोटो, व्हिडीओ काढण्याच्या नादात दोघे पाय घसरुन पाण्यात पडले. ही घटना नांदेडच्या किवळा येथे घडली आहे.
Nanded New
Nanded Newsaam tv
Published On
Summary
  • नांदेडमध्ये फिरायला गेलेल्या दोन अल्पवयीन मुलांचा तलावात बुडून मृत्यू.

  • फोटो-व्हिडीओ काढताना पाय घसरल्याने दोघेही पाण्यात पडले.

  • भंडाऱ्यात मासे पकडायला गेलेल्या दोघांचा बुडून मृत्यू.

Drowning : फिरायला गेलेल्या दोन अल्पवयीन मुलांचा तलावामध्ये बुडून मृत्यू झाल्याची घटना नांदेडमध्ये घडली आहे. फिरत असताना फोटो, व्हिडीओ काढण्याच्या नादात या दोन मुलांनी त्यांचा जीव गमावला. पाय घसरुन दोघे तलावाच्या पाण्यात पडले. रात्री उशिरा दोन्ही मुलांचे मृतदेह तलावाच्या बाहेर काढण्यात आले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नांदेडमधील बळीरामपूर भागातील शेख बाबर (वय १५ वर्षे) आणि देगलूर नाका भागातील मोहम्मद रेहान (वय १६ वर्षे) ही दोन मित्र कंधार येथे फिरण्यासाठी गेले होते. परत येताना ते किवळा येथील तलावात फोटो, व्हिडीओ काढण्यासाठी गेले. फोटो काढताना पाय घसरुन दोघेही तलावामध्ये पडले. पाण्यात बुडून त्यांचा मृत्यू झाला.

Nanded New
Cricket : अष्टपैलू खेळाडूवर कोसळला दु:खाचा डोंगर, सामन्यादरम्यान झाले वडिलांचे निधन; VIDEO

भंडाऱ्यात मासे पकडायला गेलेल्या दोघांचा बुडून मृत्यू

भंडारा जिल्ह्यातील अड्याळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खांबाडी या गावात दुर्घटना घडली. गावातील नाल्यावरच्या बंधाऱ्यात मासे पकडण्यासाठी गेलेल्या दोघांचा बंधाऱ्यातील पाण्यात बुडून मृत्यू झाला. हे दोघेही पनवी तालुक्यातील खांबाडी या गावातील रहिवासी आहेत. पाय घसरुन दोघे पाण्यात पडल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे.

Nanded New
Nandurbar : नंदुरबारच्या जिल्हाधिकारी महिलेचा प्रेरणादायी निर्णय; जुळ्या मुलांचं सरकारी शाळेत अ‍ॅडमिशन, VIDEO

अड्याळ पोलीस ठाण्यातील खांबाडी गावात नाल्यावरील बंधाऱ्यात मिलिंद सुखदेवे (वय ५५ वर्षे) आणि घनश्याम रामटेके (वय ४२ वर्षे) हे दोघेजण मासे पकडण्यासाठी गेले होते. बंधाऱ्यावरील शेवाळावरुन पाय घसरल्याने दोघे पाण्यात पडले. पाण्यामध्ये बुडून दोघांचा जीव गेला. या घटनेमुळे खांबाडी गावात शोककळा पसरली आहे.

Nanded New
MLA car accident : बुलढाण्यात आमदाराच्या कारचा भीषण अपघात, २५ वर्षाचा तरूण कोमात

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com