CM Eknath Shinde: 'सरकारची भूमिका, धोरण स्पष्ट...' मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन मुख्यमंत्र्यांचे महत्वाचे विधान, काय म्हणाले?

Mumbai News: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानुसार, मुंबई महानगरपालिका अंतर्गत सर्वकष स्वच्छता मोहीम अभियान मुंबईमध्ये राबविण्यात येत आहे.
cm eknath shinde on maratha reservation
cm eknath shinde on maratha reservationSaam TV
Published On

गिरीश कांबळे, मुंबई|ता. १७ डिसेंबर २०२३

CM Eknath Shinde News:

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानुसार, मुंबई महानगरपालिका अंतर्गत सर्वकष स्वच्छता मोहीम अभियान मुंबईमध्ये राबविण्यात येत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत एन विभागातील अमृत नगर सर्कल येथे या मोहिमेला सुरुवात झाली. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. पत्रकार परिषदेत बोलताना मुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षणाबद्दल महत्वाचे विधान केले. तसेच ठाकरे गटाने अदानी समूहाविरोधात काढलेल्या मोर्चावरही त्यांनी जोरदार टीका केली.

काय म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे?

"मुंबई महानगर पालिका (Mumbai) डीप क्लिन ड्राईव्ह करतोय. रस्ते झाडुन स्वच्छ करण्यासाठी आपण काम करतोय. एका संपुर्ण विभागाची स्वच्छता ही एकाच दिवशी २५०० हजार कर्मचारी करत आहेत. अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी यावेळी दिली. काही लोक हा स्टंट असल्याची टीका करत आहेत, पण खरे चित्र इथे येऊन बघा," असे आवाहनही त्यांनी विरोधकांना केले.

आदित्य ठाकरेंना टोला...

"याआधी रस्ते धुताना तुम्ही पाहिलेले का? कारण काही लोक दुसरीच साफ सफाई करत होते. मी त्या दिवशी बीचवर ट्रॅक्टर घेऊन गेलो तर काहींनी टीका केली. पण त्यांना माहीत नाही की तो बीच कॉम्बर होता. मी कोणाच्या टीकेला उत्तर देत नाही.." असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी यावेळी आदित्य ठाकरेंच्या (Aditya Thackeray) टीकेला उत्तर दिले.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

cm eknath shinde on maratha reservation
Paper Leak in Beed : बीडमध्ये इंजिनीअरिंग परीक्षेचा पेपर फुटला, परीक्षा रद्द; नागनाथअप्पा हालगे महाविद्यालयाचे केंद्रही रद्द

दरम्यान, यावेळी मुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षणावरुन (Maratha Reservation) महत्वाचे विधान केले. "मराठा आरक्षणाबाबत सरकारचे धोरण, सरकारची भूमिका स्पष्ट आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, कोणाचेही आरक्षण कमी न करता मराठा बांधवांना आरक्षण देण्याची सरकारची भूमिका," असल्याचे मुख्यमंत्री शिंदेंनी यावेळी स्पष्ट केले. (Latest Marathi News)

cm eknath shinde on maratha reservation
Parliament Security Breach : ...तर आम्ही आत्महत्या करु; अमोल शिंदेच्या आई-वडिलांचा इशारा

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com