Covid New Variant JN.1 : कोरोना व्हायरसच्या नव्या व्हेरिएंटने टेन्शन वाढवलं, केरळमध्ये दोघांचा मृत्यू

Covid New Variant JN.1 : केरळमध्ये नियमित देखरेखी दरम्यान, कोविड 19 च्या JN.1 उपप्रकाराचा रुग्ण आढळून आल्याची माहिती आहे. ICMRचे महासंचालक डॉ राजीव बहल यांनी ही माहिती दिली.
Covid New Variant JN.1
Covid New Variant JN.1Saam TV
Published On

Corona Virus Update :

कोरोना व्हायरसने पुन्हा एकदा डोकं वर काढल्याने चिंता वाढली आहे. कोरोनामुळे दोन रुग्णांचा मृत्यू देखील झाला आहे. केरळमध्ये कोरोनाच्या नव्या व्हेरिएंट Covid JN.1 चा रुग्ण आढळला आहे. वेगाने पसरणार हा व्हेरिएंट आहे, त्यामुळे आरोग्य यंत्रणा देखील सतर्क झाली आहे. आरोग्य विभागाने राज्यभरात या नव्या व्हेरिएंटबाबत अलर्ट जारी केला आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

केरळमधील दोन मृतांमध्ये कोझिकोड जिल्ह्यातील वट्टोली येथील 77 वर्षीय कालियाट्टुपरमबथ कुमारन आणि कन्नूर जिल्ह्यातील पनूर येथील 82 वर्षीय पलक्कंडी अब्दुल्ला यांचा समावेश आहे. द हिंदूने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

केरळमध्ये नियमित देखरेखी दरम्यान, कोविड 19 च्या JN.1 उपप्रकाराचा रुग्ण आढळून आल्याची माहिती आहे. ICMRचे महासंचालक डॉ राजीव बहल यांनी ही माहिती दिली. (Latest Marathi News)

Covid New Variant JN.1
CM Eknath Shinde: 'सरकारची भूमिका, धोरण स्पष्ट...' मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन मुख्यमंत्र्यांचे महत्वाचे विधान, काय म्हणाले?

गेल्या काही आठवड्यांपासून केरळ राज्यामध्ये कोविड-19 च्या रुग्ण संख्येत वाढ होत आहे. चाचणीसाठी पाठवण्यात आलेल्या इन्फ्लूएंझा सारख्या आजारांच्या प्रकरणांमधील नमुन्यांच्या संख्येत वाढ हे याचे कारण आहे.

यापैकी बहुतेक रुग्णांना वैद्यकीयदृष्ट्या सौम्य लक्षणे आहेत आणि हे रुग्ण कोणत्याही उपचाराशिवाय त्यांच्या घरीच स्वतःहून बरे होत आहेत.

Covid New Variant JN.1
Mumbai Latest News : मुंबईत CISF जवानाची आत्महत्या?, AK47 ने स्वतःवर झाडली गोळी, पोलीस तपास सुरु

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या नियमित सरावाचा एक भाग म्हणून, सध्या राज्यांमधील सर्व आरोग्य सुविधांमध्ये, त्यांच्या सार्वजनिक आरोग्य आणि रुग्णालय सज्जतेच्या उपायांचे मूल्यांकन करण्यासाठी एक मॉक ड्रिल सुरू आहे.

13 डिसेंबरपासून सुरू झालेला हा सराव जिल्हाधिकाऱ्यांच्या संपूर्ण देखरेखीखाली केला जात असून 18 डिसेंबर 2023 पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालय केरळ राज्याच्या आरोग्य विभागाच्या नियमित संपर्कात आहे आणि तिथे येणाऱ्या प्रवाशांवर लक्ष ठेवत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com