Parliament Security Breach : ...तर आम्ही आत्महत्या करु; अमोल शिंदेच्या आई-वडिलांचा इशारा

Latur News : संसदेमध्ये घुसखोरी करून गदारोळ करणारा अमोल शिंदे हा लातूर जिल्ह्यातल्या चाकुर तालुक्यातील झरी बुद्रुक गावचा आहे. अमोलशी संपर्क होत नसल्याने त्यांच्या आई-वडिलांची चिंता वाढली आहे.
Amol Shinde
Amol Shinde Saam TV
Published On

संदीप भोसले

Latur News :

संसदेची सुरक्षा भंग करत घुसखोरी केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या लातूरच्या अमोल शिंदेचे आई-वडील चिंतेत आहेत. सतत पोलिसांचा घेरा आणि चौकशी यामुळे ते त्रस्त झाले आहेत. त्यांना मजुरीसाठी देखील कुठे जाता येत नाही. त्यामुळे त्यांना अमोलसोबत संपर्क करुन द्या, अन्यथा आत्महत्येचा इशारा दिला आहे.

संसदेमध्ये घुसखोरी करून गदारोळ करणारा अमोल शिंदे हा लातूर जिल्ह्यातल्या चाकुर तालुक्यातील झरी बुद्रुक गावचा आहे. त्याला पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती मिळताच त्याच्या आई-वडिलांना मोठा धक्का बसला आहे. दरम्यान गेल्या 4 दिवसांपासून आपल्या मुलाशी संपर्क होत नसल्याने, आता अमोल शिंदे यांच्या आई वडिलांची चिंता वाढली आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Amol Shinde
Raju Patil on Aditya Thackeray : कल्याण लोकसभा मतदारसंघातून आदित्य ठाकरे निवडणूक लढवणार? मनसे आमदार राजू पाटील म्हणतात...

माझ्या मुलाशी संपर्क करून द्या अन्यथा आम्ही आत्महत्या करणार असल्याचा इशाराच त्यांनी दिला आहे. अमोलशी संपर्क न झाल्यामुळे मुलाच्या काळजीने त्यांचा जीव कासावीस होतो आहे. त्यामुळे अमोलच्या आठवणीत वडिलांनी अमोलचा भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, यांचा फोटो असलेला शर्ट देखील घातला आहे. (Latest Marathi News)

Amol Shinde
Dharavi Project: मविआ सरकारच्या कार्यकाळात धारावी प्रकल्पासाठी निविदा अटी अंतिम झाल्या, अदानी समूहाकडून खुलासा

याशिवाय रोज दारात पोलीस असल्याने कुणी त्यांना मजुरीला देखील बोलवतनाही. त्यामुळे जगायचं कसं असा प्रश्न देखील त्यांच्यासमोर उभा राहिला आहे, असं अमोल शिंदे याच्या वडिलांनी म्हटलं.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com