Dharavi Morcha: स्वतः अडीच वर्ष मुख्यमंत्री होते, तेव्हा धारावी बद्दल का काही केलं नाही? शिंदे गटाच्या खासदारांचा ठाकरेंना सवाल

Uddhav Thackeray Dharavi Morcha: मुंबईमधील धारावी झोपडपट्टीच्या पुनर्विकासाचे काम अदानी ग्रुपला देण्यात आलं आहे. याच विरोधात आता ठाकरे गट आक्रमक झाला आहे. यातच आज अदानींविरोधात विशाल मोर्चाचं आयोजन ठाकरे गटाच्या वतीने करण्यात आलं आहे.
Shinde Group On Uddhav Thackeray Dharavi Morcha
Shinde Group On Uddhav Thackeray Dharavi MorchaSaam Tv
Published On

Shinde Group On Uddhav Thackeray Dharavi Morcha:

मुंबईमधील धारावी झोपडपट्टीच्या पुनर्विकासाचे काम अदानी ग्रुपला देण्यात आलं आहे. याच विरोधात आता ठाकरे गट आक्रमक झाला आहे. यातच आज अदानींविरोधात विशाल मोर्चाचं आयोजन ठाकरे गटाच्या वतीने करण्यात आलं आहे. यामध्ये या मोर्च्याला सुरुवात झाली असून यात ठाकरे गटाच्या नेत्यांसोबतच काँग्रेस आणि शरद पवार गटाच्या नेत्यांचाही समावेश आहे. मात्र ठाकरे गटाच्या या मोर्च्यावर सत्ताधारी शिवसेना (शिंदे गट) आणि भाजपने टीका करण्यास सुरुवात केली आहे.

उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना शिवसेना (शिंदे गट) खासदार राहुल शेवाळे म्हणाले की, मुंबईतल्या बांधकाम व्यवसायिकांची सुपारी घेऊन उद्धव ठाकरेंचा आजचा धारावीतला मोर्चा आहे. स्वतः अडीच वर्ष मुख्यमंत्री होते, तेव्हा धारावी बद्दल का काही केलं नाही? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Shinde Group On Uddhav Thackeray Dharavi Morcha
Maharashtra News Live : हा जगातला सर्वात मोठा टीडीआर घोटाळा : उद्धव ठाकरे

ते म्हणाले आहेत की, ''स्वतःच्या आर्थिक हितासाठी उद्धव ठाकरेंचा हा मोर्चा आहे. टीडीआरबद्दल (TDR) उद्धव ठाकरे यांचे आरोप खोटे आहेत. धारावीत ४० वर्ष सत्ता उपभोगलेल्या गायकवाड कुटुंबानेही धारावीसाठी काहीही केलेले नाही. उद्धव ठाकरे यांचा आजचा मोर्चा संशयास्पद आहे.'' (Latest Marathi News)

शेवाळे म्हणाले, ''राहुल गांधी इंडिया आघाडी यांच्यासमोर स्वतःचे महत्त्व वाढवण्यासाठी उद्धव ठाकरेंचा मोर्चा आहे. राहुल गांधींचा विरोध म्हणून यांचा विरोध आहे. मुंबई विमानतळ अदानी चालवतात मातोश्रीमध्ये वीजही आदानींची आहे. मग ही वीज वापरणार नाही का? मुंबई विमानतळावरून उद्धव ठाकरे जाणार नाहीत का?''

Shinde Group On Uddhav Thackeray Dharavi Morcha
Ethanol Production: ..म्हणून केंद्राने इथेनॉल निर्मितीवर बंदी घातली होती, देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं कारण

आजचा मोर्चा हा फुसका बार आहे: चंद्रशेखर बावनकुळे

ठाकरे गटाच्या मोर्च्यावर टीका करताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, ''मुख्यमंत्री असताना विकास केला नाही. फेसबूकवर राहिला. मुंबईचा मूड महायुतीच्या बाजूने आहे. घाबरलेले ठाकरे मोर्चा काढतो आहे. पण जनतेला सर्व माहीत आहे. शिल्लक पार्टी एकत्र ठेवण्यासाठी हे सर्व सुरू आहे. त्याच्याच काळातील हे पाप आहे. मुंबई हातामधून जात आहे. म्हणून ते सर्व सुरु आहे.''

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com