धारावीचा टीडीआर घोटाळा हा जगातला सर्वात मोठा टीडीआर घोटाळा आहे. आमची चौकशी करण्याआधी स्वतःचा सुटलेला पायजमा वर घ्या, अशी टीका ठाकरेंनी यावेळी केली.
धारावीमधील सर्व लोकांना घरं मिळाली पाहिजेत, पात्र अपात्र नसावं. व्यवसाय करणाऱ्या लोकांना व्यवसायाची जागा द्या.
अपात्र लोकांना मिठागरात टाकणार म्हणजे मिठागराची जागा ही अडणीला देण्याचा डाव आहे.
धारावीचा विकास सरकारने करावी आणि धारावीतील लोकांना ५०० फुटांचं घर मिळालं पाहिजे, अशी मागणी यावेळी उद्धव ठाकरेंनी केली.
गौतम अदानी यांना सर्व काहीच देण्यात येत आहे. राहुल गांधींनी जी टीका केली होती ही सूटबूट सरकार आहे. ती बरोबर आहे.
सरकारच्या नेत्यांना ५० खोके कमी पडत आहेत. म्हणून ते धारावी गिळायला निघाले आहेत.
धारावी मोर्चावरून बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केलीय. उद्धवजींना रस्त्यावर उतरावं लागलं खर म्हणजे त्यांनी केलेलं पाप आहे. अडीच वर्ष मंत्रालयात आले नाही. महाराष्ट्र मागे गेला. त्यामुळे मुंबईचा विकास झाला नाही. गरिबांना घर मिळाली नाहीत. ते पाप आता लपवण्याकरिता मोर्चा काढल्याची टीका बावनकुळे यांनी केलीय.
उद्धव ठाकरे मोर्चासाठी धारावीकडे रवाना झाले आहेत. तर खासदार संजय राऊत हे धारावी येथे दाखल झाले आहेत.
उद्धव ठाकरे यांनी काढलेल्या मोर्चात कॉम्रेड प्रकाश रेड्डी यांनी सहभाग घेतलाय. या मोर्चा तब्बल १५ पक्ष संघटनांनी सहभाग घेतलाय.
स्वतः अडीच वर्ष मुख्यमंत्री होते तेव्हा धारावी बद्दल का काही केलं नाही ? स्वतःच्या आर्थिक हितासाठी उद्धव ठाकरेंचा हा मोर्चा आहे. टीडीआरबद्दल उद्धव ठाकरे खोटे आरोप करत आहेत. धारावीत ४० वर्ष सत्ता उपभोगलेल्या गायकवाड कुटुंबानेही धारावीसाठी काहीही केलेले नाही. राहुल गांधी इंडिया आघाडी यांच्यासमोर स्वतःचे महत्त्व वाढवण्यासाठी उद्धव ठाकरेंनी हा मोर्चा काढल्याचा आरोप शेवाळे यांनी केलाय.
धारावीकरांना घरं देण्यासाठी म्हाडा आहे
सरकारने घरं द्यावीत, सरकारने पैसे कमवावेत
नेहमी गुजरातचे उद्योगपती येतात आणि महाराष्टाचे पैसे घेऊन जातात
हा महाराष्ट्र कोणाच्या बापाचा नाही
संजय राऊत यांचा आरोप
मुंबईच्या धारावी टी जंक्शन येथून शिवसेना ठाकरे गटाच्या धारावी बचाव आंदोलनाला सुरुवात होत आहे. आंदोलनाच्या ठिकाणी मोठ्या संख्येने शिवसैनिक जमण्यास सुरुवात झाली आहे. शिवसैनिकांसोबतच शेतकरी कामगार पक्ष, सीपीआय आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे कार्यकर्ते देखील मोठ्या संख्येने जमण्यास सुरुवात झाली आहे.
ओबीसी एल्गार मेळाव्याला छगन भुजबळ येणार नसल्याची माहिती
प्रकृती बरी नसल्याने भुजबळ येणार नसल्याची दिली माहिती
भुजबळ यांची प्रकृती बरी नसल्याने ते येऊ शकले नाहीत, असे खासदार रामदास तडस यांनी सांगितले.
शेवगाव तालुक्यातील ठाकूर निमगाव येथे खासदार सुजय विखेंचा ताफा अडवला
सकल मराठा समाजाच्या वतीने खासदार विखेंचा ताफा रोखण्यात आला
जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत राजकीय पुढार्यांनी गावात येऊ नये असा पवित्रा गावकऱ्यांनी घेतला
खासदार सुजय विखे पाटील यांचा ताफा अडवल्याने नियोजित उद्घाटनाच्या कार्यक्रमाला न जाता विखे फिरले माघारी
संसदेत घडलेली घटना ही चूकच असून, त्यामागे बेरोजगारी आणि महागाई ही कारणे आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कारभारामुळे तरुणांना नोकऱ्या मिळत नाहीत, अशा शब्दांत राहुल गांधी यांनी टीका केली आहे.
नाशिकच्या ऐतिहासिक आणि पुरातन मंदिर असलेल्या कपालेश्वर मंदिरात वस्त्रसंहिता लागू
भारतातील प्रसिद्ध मंदिरांमध्ये कपालेश्वर मंदिराची ओळख
अशोभनीय आणि अंगप्रदर्शन होईल असे कपडे परिधान करणाऱ्यांना मंदिरात प्रवेश नाही
कपालेश्वर देवस्थान संस्थांनी लावले मंदिराबाहेर फलक
हाफ पॅन्ट, बर्मुडा, नाईट पॅन्टमध्ये आलेल्या भाविकांना मंदिरात प्रवेश नाही
अशोभनीय कपडे परिधान करणाऱ्यांना मंदिरात प्रवेश बंदी
पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी भर कार्यक्रमात कोल्हापूरचे आयुक्त के मंजूलक्ष्मी यांना विचारला जाब
मंजूर असलेली कामे तातडीने का पूर्ण केली नाहीत, असा केला सवाल
रस्ते प्रकल्पाचे काम कमिशन मिळालं नाही म्हणून थांबले आहे, असे माझ्या कानावर आले आहे असे सांगतानाच केली कानउघाडणी
गरज लागली तर अतिरिक्त आयुक्तांची बदली करण्याचाही दिला इशारा
मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी नाशिकच्या येवला तालुक्यातील सुरेगाव रास्ते येथे गेल्या ५३ दिवसांपासून उपोषण सुरू आहे. मराठा समाजातील तरूण आक्रमक झाले असून, त्यांनी छगन भुजबळ आणि नितेश राणे यांच्या पुतळ्याला जोडे मारून आंदोलन केले. सुरेगाव रास्ते येथे निषेध व्यक्त करत त्यांचा प्रतिकात्मक पुतळाही जाळला.
सरकारने शब्द पाळला नाही तर मी जरांगे पाटील यांच्यासोबत आंदोलनात उभं राहणार
मनोज जरांगे यांनी दिलेली तारीख जवळ येत आहे. 17 तारखेला जरांगे नवीन आंदोलनाची घोषणा करणार आहेत.
सरकारने मनोज जरांगे यांना आतापर्यंत शिंदे समितीने काय काम केलं त्याचा अहवाल द्यावा
सरकारने गुन्हे मागे घ्यावेत. मी जरांगे यांना शब्द दिला आहे. त्यामुळे मी शब्दांचा पक्का आहे. मी जरांगे यांच्या आंदोलनात सहभागी होणार, बच्चू कडूंची माहिती
मागील अधिवेशनात प्रलंबित राहिलेले लोकायुक्त विधेयक विधानपरिषदेतही मंजूर
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी सरकारचे मानले आभार
या कायद्याच्या लोकशिक्षण आणि लोकजागृतीसाठी राज्याचा दौरा करणार
ठाकरे सरकारने केवळ आश्वासन दिलं, पण कायदा केला नाही
देवेंद्र फडणवीस यांनी वेळ लावला, मात्र कायदा केला
ठाकरे सरकारला हा कायदा नकोच होता, अण्णा हजारे यांची टीका
राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. कर्जत-खालापूर मतदारसंघाचे माजी आमदार सुरेश लाड यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. चंद्रशेखर बावनकुळे, देवेंद्र फडणवीस आणि रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला आहे.
मुंबईत ठाकरे गटाच्या मोर्चासाठी चोख पोलीस बंदोबस्त
जवळपास ३०० च्या आसपास पोलीस कर्मचारी
३० पोलीस अधिकारी आणि राज्य राखीव दलाच्या ४ ते ५ तुकड्या
पोलीस उपायुक्त, अतिरिक्त पोलिस आयुक्तही विशेष लक्ष ठेवून असणार
ऊसापासून इथेनॉल निर्मितीबंदीचा निर्णय अखेर मागे घेण्यात आलाय.
सन 2023-2024 साठी ऊसापासून इथेनॉल बनवता येणार नाही, असा निर्णय केंद्र सरकारने घेतला होता.
तो आपलाच निर्णय मागे घेताना साखरेची कमाल मर्यादा १७ लाख टन सरकारने निश्चित केली आहे.
काल झालेल्या बैठकीत महत्वपूर्ण निर्णय
सरकारच्या या निर्णयाला साखर कारखानदारांनी विरोध केला होता.
ठाकरे गटाच्या मोर्चापूर्वी शिवसेना शिंदे गटाकडून टीझर रीलीज करण्यात आला आहे. उद्धव ठाकरे यांचा चांगल्या प्रकल्पांना विरोध असल्याचं या टीझरमधून दाखवण्यात आले आहे. मुंबई मेट्रो, आरे कारशेड आणि समृद्धी महामार्गाला आणि आता धारावी पुनर्विकासाला विरोध करत आहेत. विकासाला विरोध हीच उद्धव ठाकरे यांची भूमिका असल्याचा आरोप शिंदे गटाने केला आहे.
पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर वाहनचालकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर अमृतांजन पुलाजवळ ट्रक बंद पडल्याने वाहनांचा वेग मंदावला. त्यातच आज शनिवार असल्याने अनेक पर्यटक बाहेर पडल्याने वाहनांची संख्या वाढली आहे. बंद पडलेला ट्रक बाजूला घेण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत.
संसदेत फोडण्यात आलेल्या स्मोक कँडलची कल्याणमधून खरेदी खरेदी केल्याचे माहिती समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे. ही माहिती मिळताच गुप्तचर यंत्रणेची शोधमोहीम सुरू झाली आहे. स्थानिक पोलिसांना याबाबत विचारणा केली असता त्यांना याबाबत काहीच कल्पना नसल्याचे सांगण्यात आले.
आतापर्यंत कोणत्याही केंद्रीय एजन्सीने आम्हाला कोणत्याही दुकानांची माहिती दिली नाही, परंतु बातम्यांवरून समजल्यानंतर आमची टीम दुकान शोधण्याचा प्रयत्न करत आहे. स्थानिक पोलिसांनी कल्याण मधील फटाके विक्रेत्यांचे चौकशी सुरू केल्याची माहिती सूत्रांनी दिली .
संसदेतील फटाक्यांचे कल्याण कनेक्शन समोर आल्यानंतर कल्याण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.
धारावी पुनर्विकास प्रकल्पाविरोधात उद्धव ठाकरे गट आक्रमक झाला असून आज दुपारी ३ वाजता अदानींविरोधात विशाल मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात बॅनर लावण्यात आले आहेत. तसंच सकाळपासून पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला आहे.
राज्य विधिमंडळाचे अधिवेशनाला शनिवार आणि रविवारी सुट्टी असल्याने आज कोणतेही कामकाज होणार नाही. यामुळे आज भाजपच्या प्रदेश पदाधिकाऱ्यांची नागपुरात बैठक बोलवण्यात आली आहे. या बैठकीत आगामी निवडणुकांबाबत रणनिती आखली जाणार आहे.
मुंबई इंडियन्सने रोहित शर्मा ऐवजी हार्दिक पड्याकडे कर्णधारपद दिले. त्यानंतर अनफॉलो मुंबई इंडियन्स हा ट्रेंड सुरु झाला आहे. यासह देशविदेश आणि राज्यातील प्रत्येक घडामोडींचे अपडेट्स या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील. तेव्हा साम टीव्हीला फॉलो करा...
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.