Paper Leak in Beed : बीडमध्ये इंजिनीअरिंग परीक्षेचा पेपर फुटला, परीक्षा रद्द; नागनाथअप्पा हालगे महाविद्यालयाचे केंद्रही रद्द

Engineering Paper Leak in Beed : अभियांत्रिकीच्या (बीई सिव्हिल) डिझाइन ऑफ स्ट्रक्चर पेपर-३ ची प्रश्नपत्रिका एका प्राध्यापकाने पेपर सुरू होण्यापूर्वीच सोशल मीडियावर व्हायरल केली.
Papaer Leak News
Papaer Leak NewsSaam TV

Chhatrapati Sambhajinagar News :

छत्रपती संभाजीनगर येथे इंजिनीअरिंगच्या परीक्षेचा पेपर फुटल्याची घटना समोर आली आहे. या घटनेनंतर कॉलेजे परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अंतर्गत बीड जिल्ह्यातील परळी येथील नागनाथअप्पा हालगे अभियांत्रिकी महाविद्यालयात शनिवारी हा प्रकार घडला.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

अभियांत्रिकीच्या (बीई सिव्हिल) डिझाइन ऑफ स्ट्रक्चर पेपर-३ ची प्रश्नपत्रिका एका प्राध्यापकाने पेपर सुरू होण्यापूर्वीच सोशल मीडियावर व्हायरल केली. तसेच या केंद्रावर मोबाइल समोर ठेऊन मास कॉपी सुरू असल्याचेही गुरुवारी पथकाच्या पाहणीत उघड झाले. (Latest Marathi News)

Papaer Leak News
Pune News: भयंकर! मित्राच्या मृत्यूसाठी अघोरी पुजा, वॉट्सअपवर पाठवला व्हिडिओ; पुण्यातील खळबळजनक प्रकार

यामुळे कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी तातडीने हे परीक्षा केंद्र व शनिवारचा पेपरच रद्द केला. शिवाय प्राचार्य, परीक्षा समन्वयकांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्याचे आदेशही दिले. 'डिझाइन ऑफ स्ट्रक्चर' (३) या पेपरची वेळ २ वाजेची होती, पण दुपारी १ वाजून ११ मिनिटांनीच प्रश्नपत्रिका व्हायरल झाली.

Papaer Leak News
Raju Patil on Aditya Thackeray : कल्याण लोकसभा मतदारसंघातून आदित्य ठाकरे निवडणूक लढवणार? मनसे आमदार राजू पाटील म्हणतात...

परीक्षा केंद्रही बदललं

परळीच्या हालगे महाविद्यालयाचे परीक्षा केंद्र रद्द करण्याची निर्णयही घेण्यात आला आहे. ही परीक्षा आता वैद्यनाथ महाविद्यालयात घेतली जाणार आहे. बीई सिव्हील अंतिम वर्षाचा संबधित पेपरही रद्द करण्यात आला आहे. तसेच चार महाविद्यालयातील ७९ विद्यार्थ्यांची परीक्षा पुन्हा घेतली जाणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com