रेल्वे स्थानकावर हायव्होल्टेज ड्रामा! प्रेयसीची मनधरणी करण्यासाठी तरुणाने घातले थेट लोटांगण, व्हिडिओ व्हायरल

Borivali Station Viral Video: मुंबईच्या बोरिवली रेल्वे स्थानकावर प्रेयसीचा राग शांत करण्यासाठी तरुणाने चक्क तिच्या पाया पडत माफी मागितल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. पोलीस आणि आरपीएफ जवानांनी घटनास्थळी धाव घेत मध्यस्थी केली.
A screengrab from the viral video showing the youth kneeling before his girlfriend at Mumbai's Borivali railway station as commuters and security personnel look on.
A screengrab from the viral video showing the youth kneeling before his girlfriend at Mumbai's Borivali railway station as commuters and security personnel look on.saam tv
Published On

संजय गडदे, साम टीव्ही

मुंबईतील लोकल रेल्वे स्थानके ही नेहमीच गर्दी आणि घाईगडबडीसाठी ओळखली जातात. परंतु नुकताच मुंबईच्या बोरिवली रेल्वे स्थानकावर एक अत्यंत धक्कादायक आणि भावनिक प्रसंग पाहायला मिळाला. एका तरुणाने आपल्या प्रेयसीचा राग शांत करण्यासाठी चक्क भर रेल्वे प्लॅटफॉर्मवर तिच्या समोर लोटांगण घालत माफी मागितली. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

A screengrab from the viral video showing the youth kneeling before his girlfriend at Mumbai's Borivali railway station as commuters and security personnel look on.
Pune Accident: जेजुरीत अपघाताचा थरार! पायी जाणाऱ्या वारकऱ्यांना ट्रकने चिरडलं, ४ जणांचा मृत्यू

मिळालेल्या माहितीनुसार, बोरिवली रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्मवर एका प्रेमी युगुलामध्ये जोरदार वाद सुरू होता. तरुणी अत्यंत रागात होती आणि तिथून निघून जाण्याचा प्रयत्न करत होती. मात्र, तिचा राग शांत करण्यासाठी तरुणाने सर्व मर्यादा बाजूला ठेवून थेट तिच्या पायाशी दंडवत घातला. तरुण वारंवार हात जोडून तिची समजूत काढण्याचा आणि माफी मागण्याचा प्रयत्न करत होता, पण तरुणीचा राग काही शांत होत नव्हता.

A screengrab from the viral video showing the youth kneeling before his girlfriend at Mumbai's Borivali railway station as commuters and security personnel look on.
Pune Crime: पुणे हादरले! नवऱ्याकडून बायकोची हत्या, झोपेत असताना डोक्यात सिलिंडर टाकला

पोलीस आणि आरपीएफ जवानांचा हस्तक्षेप

रेल्वे स्थानकासारख्या सार्वजनिक ठिकाणी सुरू असलेला हा हायव्होल्टेज ड्रामा पाहून प्रवाशांची मोठी गर्दी जमा झाली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून बोरिवली लोहमार्ग पोलीस (GRP) आणि रेल्वे संरक्षण दलाच्या (RPF) जवानांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी हस्तक्षेप करत त्या तरुणाला उठवले आणि दोघांनाही शांत राहण्याचे आवाहन करत समजावण्याचा प्रयत्न केला.

A screengrab from the viral video showing the youth kneeling before his girlfriend at Mumbai's Borivali railway station as commuters and security personnel look on.
मंत्री महोदय जरा इथेही लक्ष द्या, रस्ते-वीज गुल, स्मार्ट सिटीच्या निव्वळ बाता

प्लॅटफॉर्मवर उपस्थित असलेल्या काही प्रवाशांनी हा संपूर्ण प्रकार आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केला. हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर शेअर होताच वाऱ्यासारखा व्हायरल झाला असून, त्यावर नेटकऱ्यांच्या विविध प्रतिक्रिया येत आहेत. दरम्यान या दोघांमध्ये नेमका कोणत्या कारणावरून वाद झाला होता, याचे अधिकृत कारण अद्याप समोर आलेले नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com