

पुणे जिल्ह्यातील जेजुरीजवळ भीषण अपघात
भरधाव ट्रकने वारकऱ्यांना चिरडले
ट्रकच्या धडकेत ४ वारकऱ्यांचा मृत्यू
अपघातामध्ये दोन जण गंभीर जखमी झालेत
पुणे जिल्ह्यातल्या जेजुरीतमध्ये भीषण अपघाताची घटना घडली. संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीमध्ये सहभागी झालेल्या वारकऱ्यांना भरधाव ट्रकने चिरडलं. जेजुरीतील महामार्गावर ही घटना घडली. या अपघातामध्ये ४ वारकऱ्यांचा मृत्यू झाला तर अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. या जखमी वारकऱ्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघातामुळे जेजुरीत एकच गोंधळ उडाला.
मिळालेल्या माहितीनुसार, जेजुरीमध्ये माऊलींच्या वारीत पायी जाणाऱ्या वारकऱ्यांना भरधाव टॅकने जोरदार धडक दिली. पुरंदर तालुक्यातील जेजुरीजवळ ही अपघाताची घटना घडली. ट्रकच्या धडकेत ६ वारकरी गंभीर जखमी झाले होते. यामधील ४ वारकऱ्यांचा जास्त रक्तस्राव झाल्यामुळे जागीच मृत्यू झाला. तर दोन वारकऱ्यांची प्रकृती गंभीर आहे. गंभीर जखमी वारकऱ्यांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे.
माऊलींची पालखीने आज सासवडवरून जेजुरीच्या दिशेने प्रस्थान ठेवले. जेजुरीत दाखल झाल्यावर पालखीवर भंडाऱ्याची उधळण केली जाते. अशातच हा अपघातझाला. वारीमधीलच ट्रक वारकऱ्यांच्या गर्दीत घुसला. ट्रकने अनेक वारकऱ्यांना चिरडले. या अपघातामध्ये ४ वारकऱ्यांचा मृत्यू झाला. यामध्ये ३ महिला आणि एका पुरूषाचा समावेश आहे. दोन जखमींची प्रकृती चिंताजनक आहे. या अपघातामुळे घटनास्थळी एकच गोंधळ उडाला आणि सर्वांची पळापळ झाली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.