मंत्री महोदय जरा इथेही लक्ष द्या, रस्ते-वीज गुल, स्मार्ट सिटीच्या निव्वळ बाता

Shocking Reality Near Mumbai: एकीकडे तिसरी मुंबई निर्माण करण्यासाठी सरकारनं प्रयत्न सुरू केले आहेत. मात्र, असं असलं तरी येथील स्थानिकांना पायाभूत सुविधांपासून वंचितच राहावं लागतंय. खालापूर आणि कर्जत तालुक्यांमध्ये पायाभूत सुविधांअभावी गर्भवतींना जीवघेणा प्रवास करावा लागतोय. पाहूयात यावरचा एक स्पेशल रिपोर्ट...
A pregnant woman being carried in a cloth sling through rough terrain in Khalapur due to lack of roads and transport facilities.
A pregnant woman being carried in a cloth sling through rough terrain in Khalapur due to lack of roads and transport facilities.saam tv
Published On

देशाच्या आर्थिक राजधानीपासून अवघ्या ६० किलोमीटरवर असलेलं खालापूर..पण या खालापूरजवळील आदिवासी पाड्यांमधल हे भयाण वास्तव बघा...उंबरणेवाडी, आरकसवाडी आणि पिरकडवाडी या वाड्यांमध्ये आजही पक्का रस्ता नाही..त्यामुळे गर्भवती महिलांना झोळीचा आधार घेत मैलोनमैल खांद्यावरून दवाखान्यात नेण्याची वेळ आलीये..

तर दुसरीकडे, खालापूरपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या कर्जतमध्येही धक्कादायक प्रकार समोर आलाय. तब्बल चार दिवस लाईट नसल्यानं कर्जतमधील मोहली प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टरांवर चक्क मोबाईलच्या टॉर्चच्या प्रकाशात प्रसूती कऱण्याची वेळ आलीये...

खालापूर आणि कर्जतमधील ही विदारक दृश्यं... विकसित महाराष्ट्रच्या घोषणा देणाऱ्यांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारी आहेत. प्रशासन आणि लोकप्रतिनिधी या मुलभत सुविधा पुरवण्यात अपयशी ठरलं आहे.आजही इथल्या नागरिकांना साधा रस्ता आणि वीज मिळवण्यासाठी जर इतका संघर्ष करावा लागत असेल, तर मग विकासाच्या निव्वळ बाताच म्हणाव्या लागतील..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com