Mumbai Local : प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता दर २ मिनिटांनी धावणार लोकल, काय आहे रेल्वेचा नवा प्लान?

Mumbai Local Update News : मुंबई लोकल प्रवाशांसाठी मोठी बातमी! भारतीय रेल्वेची ‘कवच 5.0’ प्रणाली लागू झाल्यानंतर लोकल गाड्यांमधील अंतर तीन मिनिटांवरून दोन मिनिटांपर्यंत कमी होऊ शकते.
MUMBAI LOCAL TRAINS TO RUN EVERY TWO MINUTES? KAVACH 5.0 TO BOOST SAFETY AND INCREASE TRAIN FREQUENCY
MUMBAI LOCAL TRAINS TO RUN EVERY TWO MINUTES? KAVACH 5.0 TO BOOST SAFETY AND INCREASE TRAIN FREQUENCYSaam Tv
Published On
Summary
  • रेल्वेची ‘कवच 5.0’ नवीन प्रणाली

  • मुंबई लोकल गाड्यांमधील अंतर तीन मिनिटांवरून दोन मिनिटांपर्यंत

  • पश्चिम आणि मध्य रेल्वेवरील लोकल फेऱ्यांची संख्या 4,000 पर्यंत वाढणार

  • मुंबईकरांसाठी अधिक सुरक्षित, वेगवान आणि आरामदायी लोकल प्रवास

मुंबई लोकलमधून प्रवास करताना ट्रेन उशिराने असल्या तर पुढच्या कामकाजावर मोठा परिणाम होतो. मात्र यासारख्या समस्यांवर रेल्वेने आता मोठा तोडगा काढला आहे. सध्या दर ३ मिनिटांनी येणारी लोकल येत्या काळात दर दोन मिनिटांनी उपलब्ध होणार आहे. दररोज लाखो प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या या लोकल सेवेला अधिक सुरक्षित, वेगवान आणि कार्यक्षम बनवण्यासाठी रेल्वे प्रशासनाने स्वदेशी ‘कवच 5.0’ या अत्याधुनिक ऑटोमॅटिक ट्रेन प्रोटेक्शन (ATP) प्रणालीच्या विकासाला गती दिली आहे. विशेष म्हणजे ही यंत्रणा मुंबईसारख्या गर्दीच्या उपनगरीय रेल्वे मार्गांसाठी खास डिझाइन करण्यात येत आहे.

मुंबईच्या पश्चिम आणि मध्य रेल्वे मार्गांवर दररोज मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने लोकल फेऱ्यांची संख्या वाढवण्याची मागणी सातत्याने होत आहे. सध्या या दोन्ही मार्गांवर मिळून दररोज सुमारे 3,254 लोकल फेऱ्या चालवल्या जातात. मात्र ‘कवच 5.0’ प्रणाली पूर्णपणे काम करायला लागल्यानंतर ही संख्या तब्बल 4 हजारांपर्यंत वाढवणे शक्य होणार असल्याचे सांगितले जात आहे.

MUMBAI LOCAL TRAINS TO RUN EVERY TWO MINUTES? KAVACH 5.0 TO BOOST SAFETY AND INCREASE TRAIN FREQUENCY
New Bride Ritual : आषाढ महिन्यात नवविवाहितेला माहेरी का पाठवतात? काय आहे परंपरा

या नव्या तंत्रज्ञानाचा सर्वात मोठा फायदा म्हणजे दोन लोकल गाड्यांमधील सुरक्षित अंतर कमी करता येणार आहे. सध्या अनेक मार्गांवर लोकल गाड्या साधारण तीन मिनिटांच्या अंतराने धावतात. परंतु नवीन प्रणालीमुळे हे अंतर दोन मिनिटांपर्यंत आणणे शक्य होईल. परिणामी प्रवाशांना वेळेवर लोकल सेवा उपलब्ध होणार असून गर्दी कमी होण्यासही मदत मिळेल.

MUMBAI LOCAL TRAINS TO RUN EVERY TWO MINUTES? KAVACH 5.0 TO BOOST SAFETY AND INCREASE TRAIN FREQUENCY
Tea Tips : गोड की खारट? चहासोबत कोणतं बिस्कीट खाणं ठरेल शरीरासाठी घातक

रेल्वे मंत्रालयाच्या माहितीनुसार, ‘कवच 5.0’ ही कॅब-आधारित सिग्नल प्रणाली असेल. त्यामुळे लोकोपायलटला ट्रॅकवरील सिग्नलकडे सतत लक्ष ठेवण्याची गरज भासणार नाही. सर्व सिग्नल आणि आवश्यक सूचना थेट इंजिनच्या केबिनमधील स्क्रीनवर दिसतील. याशिवाय मुसळधार पाऊस, दाट धुके परिस्थितीतही ही प्रणाली प्रभावीपणे काम करणार आहे.

MUMBAI LOCAL TRAINS TO RUN EVERY TWO MINUTES? KAVACH 5.0 TO BOOST SAFETY AND INCREASE TRAIN FREQUENCY
Snake Facts : सापांना कान नाहीत, मग ते आवाज कसे ऐकतात? ९९ टक्के लोकांना याबद्दल माहिती नाही

जर लोकोपायलटने सिग्नल ओलांडण्याचा धोका निर्माण केला किंवा गाडीचा वेग मर्यादेपेक्षा जास्त झाला, तर ‘कवच 5.0’ आपोआप ब्रेक लावून अपघात टाळण्यास मदत करेल. मुंबईतील वाढती प्रवासी संख्या आणि सुरक्षिततेची गरज लक्षात घेता ‘कवच 5.0’ ही प्रणाली उपनगरीय रेल्वे सेवेसाठी गेमचेंजर ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे येत्या काळात मुंबईकरांचा लोकल प्रवास अधिक सुरक्षित, जलद आणि आरामदायी होण्याची अपेक्षा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com