Alisha Khedekar
कमी साखर असलेलं साधं बिस्कीट चहात बुडवून खाल्ल्यास अतिरिक्त कॅलरी टाळता येतात.
खारट बिस्किटांमध्ये सोडियम जास्त असू शकतो. जास्त सेवनामुळे रक्तदाब वाढण्याचा धोका वाढतो.
पूर्ण धान्य किंवा फायबरयुक्त बिस्कीट पचनासाठी चांगले ठरतात. ते जास्त वेळ पोट भरल्याची भावना देतात.
क्रीम, चॉकलेट किंवा जास्त साखर असलेली बिस्किटे चहासोबत चविष्ट वाटतात, पण आरोग्यासाठी कमी फायदेशीर असतात.
चहासोबत दोन ते तीन बिस्किटे पुरेशी आहेत. जास्त बिस्किटे खाल्ल्यास अनावश्यक कॅलरी वाढतात.
बिस्कीट खरेदी करताना घटक तपासा. ट्रान्स फॅट किंवा हायड्रोजनेटेड तेल असलेली उत्पादने शक्यतो टाळा.
बिस्कीट कितीही चांगले असले तरी साखरयुक्त चहा जास्त प्रमाणात घेतल्यास आरोग्यावरील फायदा कमी होतो.