Mumbai Local: मुंबईत भरदिवसा धावत्या लोकलमध्ये स्मोकिंग, प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; संतापजनक VIDEO व्हायरल

Mumbai Local Shocking Video: मुंबईमध्ये धावत्या लोकलमध्ये दोन जण स्मोकिंग करत असल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकरी संतप्त झाले असून त्यांनी कारवाईची मागणी केली.
Mumbai Local: मुंबईत भरदिवसा धावत्या लोकलमध्ये स्मोकिंग, प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; संतापजनक VIDEO व्हायरल
Mumbai Local Shocking VideoSaam Tv
Published On
  • मुंबई लोकलमधील संतापजनक व्हिडीओ समोर

  • दोघे जण धावत्या लोकलमध्ये चिलम ओढताना दिसले

  • धावत्या लोकलमधील नशेचा प्रकार

  • हा व्हिडीओ पश्चिम रेल्वे मार्गावरील असल्याची माहिती

मुंबईची लाइफलाइन म्हणून ओळख असलेली मुंबई लोकल पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. पण यावेळी मुंबई लोकल प्रवाशांच्या सोयी-सुविधांमुळे नाही तर प्रवाशांच्या वाईट कृत्यामुळे चर्चेत आली आहे. मुंबई लोकलमधील दोन प्रवाशांचा एक असा व्हिडीओ समोर आला आहे जो पाहून नेटकऱ्यांना राग अनावर झाला आहे. सोशल मीडियावर तुफान व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये दोन प्रवासी धावत्या लोकलमध्ये बिनधास्तपणे चिलम ओढताना दिसत आहे. हा व्हिडीओ समोर येताच प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मुंबई लोकलमधील सुरक्षा, नियमांचे पालन आणि रेल्वे प्रशासनाच्या व्यवस्थेवर देखील प्रश्न उपस्थित केला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, व्हायरल होणारा हा व्हिडीओ पश्चिम रेल्वे मार्गावर धावण्याऱ्या लोकलमधील आहे. व्हिडीओमध्ये एक तरुण आणि आणखी एक व्यक्ती लोकलच्या मालडब्यामध्ये बसून नशा करत आहेत. दोघेही चिलम ओढताना दिसत आहेत. या दोन व्यक्तींसोबत बसलेल्या एका व्यक्तीने या दोघांचे कृत्य मोबाइलमध्ये कैद केले. त्यानंतर हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Mumbai Local: मुंबईत भरदिवसा धावत्या लोकलमध्ये स्मोकिंग, प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; संतापजनक VIDEO व्हायरल
Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये मराठीला बंदी, मध्य रेल्वेचा मराठीद्वेष उघड

व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की, एक तरुण चिलम पेटवतो आणि ओढण्यास सुरूवात करतो. त्यानंतर तो सोबत असलेल्या दुसरा व्यक्तीकडे चिलम देतो. तो देखील चिलम ओढतो. दोघेही आलटून पालटून चिलम ओढतात. हे दोघेजण लोकलमधील इतर प्रवशांचा विचार न करता बिनधास्तपणे चिलम ओढत आहेत. ही घटना समोर येताच नेटकरी संतप्त झाले आहेत. नेटकऱ्यांनी हा व्हिडीओ पाहून नाराजी व्यक्त केली. काही नेटकऱ्यांनी रेल्वे प्रशासनाकडे दोघांविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी केली.

Mumbai Local: मुंबईत भरदिवसा धावत्या लोकलमध्ये स्मोकिंग, प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; संतापजनक VIDEO व्हायरल
Mumbai Local: मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, डोंबिवलीजवळ लोकलचे ३ डबे रुळावरून घसरले; प्रवाशांचे हाल, VIDEO समोर

दरम्यान, हा व्हिडीओ कधीचा आहे?, कोणत्या लोकलमधून दोघेही प्रवास करत होते?, ही घटना नेमकी कोणत्या स्थानकादरम्यान घडली? याबाबत अद्याप काही माहिती समोर आली नाही. पण व्हिडीओच्या आधारे रेल्वे पोलिस दोन्ही व्यक्तींचा शोध घेत असून त्यांच्याविरोधात कठोर कारवाई करण्यात येणार आहे. भारतीय रेल्वेमध्ये धुम्रपान करणे बंधनकारक आहे. रेल्वेच्या अधिनियम, १९८९ च्या कलम १६७ च्या अंतर्गत रेल्वे किंवा रेल्वे स्टेशन परिसरात धुम्रपान करणे गुन्हा आहे. असे केल्यास दंडात्मक कारवाई केली जाऊ शकते.

Mumbai Local: मुंबईत भरदिवसा धावत्या लोकलमध्ये स्मोकिंग, प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; संतापजनक VIDEO व्हायरल
Mumbai Local: धावत्या लोकलमध्ये चढताना तोल गेला, प्लॅटफॉर्म अन् ट्रेनमध्ये अडकून तरुणाचा मृत्यू; अपघाताचा थरारक VIDEO

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com