Mumbai Local: मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, डोंबिवलीजवळ लोकलचे ३ डबे रुळावरून घसरले; प्रवाशांचे हाल, VIDEO समोर

Mumbai Local Disrupted: मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली. डोंबिवली रेल्वे स्थानकाजवळ लोकलचा डबा रुळावरून घसरला. या घटनेमुळे लोकलसेवा उशिराने धावत आहेत. त्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहे.
Mumbai Local: मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, डोंबिवलीजवळ लोकलचे ३ डबे रुळावरून घसरले; प्रवाशांचे हाल, VIDEO समोर
Mumbai Local Disrupted Saam Tv
Published On

Summary -

  • मध्य रेल्वे मार्गावरील लोकलसेवा विस्कळीत

  • डोंबिवलीजवळ लोकलचे ३ डबे रुळावरून घसरले

  • लोकल रिकामी असल्यामुळे मोठी दुर्घटना टळली

  • आठवड्याच्या पहिल्याच दिवशी लोकलसेवा विस्कळीत झाल्याने प्रवाशांचे हाल

मयूर राणे, मुंबई

ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. डोंबिवली रेल्वे स्थनकाजवळ लोकलचे ३ डबे रुळावरून घसरले. ही लोकल कळवा कारशेडमधून अंबरनाथ रेल्वे स्थानकाच्या दिशेने जात होती. लोकल रिकामी असल्यामुळे सुदैवाने कोणतीही अनुचित घटना घडली नाही. पण या घटनेमुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. दोन्ही मार्गावरील लोकलसेवा उशिराने सुरू आहेत. त्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहे.

आज सकाळी ८.३० वाजताच्या सुमारास डोंबिवली रेल्वे स्थानकाजवळ लोकलचे ३ डबे रुळावरून घसरल्याची माहिती रेल्वेच्या मुख्य जनसंपर्क अधिकाऱ्यांनी दिली आहे. ट्रेनमध्ये प्रवासी नसल्यामुळे मोठी दुर्घटना टळली. ही लोकल कारशेडमधून अंबरनाथच्या दिशेने जात होती. या घटनेमुळे मध्य रेल्वेची अप आणि डाऊन या दोन्ही मार्गावरील लोकलसेवा विस्कळीत झाली आहे. त्यामुळे मध्य रेल्वेच्या सर्वच रेल्वे स्थानकावर प्रवाशांची गर्दी झाली आहे.

Mumbai Local: मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, डोंबिवलीजवळ लोकलचे ३ डबे रुळावरून घसरले; प्रवाशांचे हाल, VIDEO समोर
Mumbai Metro: गुड न्यूज! ३ एप्रिलपासून मुंबईत २ नव्या मार्गावर मेट्रो धावणार, प्रवासाचा वेळ वाचणार; कुठून कसा कराल प्रवास?

आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाल्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहे. मुंबईच्या दिशेला कामाला निघालेल्या प्रवाशांचे चांगलेच हाल होत आहे. ऑफिसला जाण्यासाठी उशिर होत आहे त्यामुळे आज त्यांना लेटमार्क लागण्याची शक्यता आहे. घटनेची माहिती मिळताच रेल्वे कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली असून लोकलसेवा सुरळीत करण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू आहेत.

Mumbai Local: मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, डोंबिवलीजवळ लोकलचे ३ डबे रुळावरून घसरले; प्रवाशांचे हाल, VIDEO समोर
Mumbai Local: मुंबईत धावत्या लोकलमधून पडून तरुणाचा मृत्यू, नातेवाईकांच्या अंत्यविधीला जाताना काळाने गाठलं

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com