Railway Mega Block : प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! कल्याण-बदलापूर रेल्वे मार्गावर मध्यरात्री पॉवर ब्लॉक

Mumbai Railway Mega Block News : मुंबई लोकल प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! कल्याण-बदलापूर रेल्वे मार्गावर २८ आणि २९ नोव्हेंबरच्या मध्यरात्री विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. संपूर्ण माहिती वाचा.
railway megablock news
railway megablock newsAI image
Published On: 

मुंबई लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. कल्याण ते बदलापूर रेल्वे मार्गावर शनिवार आणि रविवारच्या मध्यरात्री विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. रेल्वे मार्गाच्या विस्ताराचे काम करण्यासाठी हा ब्लॉक घेण्यात येणार असून, यामुळे मध्यरात्रीच्या लोकल सेवांवर परिणाम होणार आहे. काही लोकल गाड्या रद्द करण्यात येणार असून, मेल आणि एक्स्प्रेस गाड्यांच्या मार्गातही बदल करण्यात आला आहे.

मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाकडून कल्याण-बदलापूर रेल्वे मार्गावर तिसऱ्या आणि चौथ्या रेल्वे मार्गाच्या कामासाठी हा ब्लॉक घेण्यात येणार आहे. २८ नोव्हेंबरच्या रात्री म्हणजेच शनिवार आणि रविवारच्या मध्यरात्री १ वाजून ४० मिनिटांपासून ते २९ नोव्हेंबर रोजी पहाटे ३ वाजून ४० मिनिटांपर्यंत हा ब्लॉक असेल. या काळात उल्हासनगर आणि अंबरनाथ येथे मोठ्या रोड क्रेनच्या मदतीने रेल्वे मार्गावरील ट्रस हटवण्याचे काम केले जाणार आहे.

railway megablock news
Gold Rate Today : सोनं अचानक इतकं कसं महागलं? सुवर्णनगरीत दरांची मोठी झेप; चांदीचीही जोरदार मुसंडी

या ब्लॉकदरम्यान कल्याण ते कर्जत दरम्यान अप आणि डाऊन मार्गावरील उपनगरीय रेल्वे सेवा बंद राहणार आहेत. त्यामुळे रात्री उशिरा आणि पहाटे प्रवास करणाऱ्या प्रवाशांना रेल्वेच्या वेळापत्रकात झालेल्या बदलांची माहिती घेऊनच प्रवास करावा लागणार आहे. ब्लॉकपूर्वी बदलापूरच्या दिशेने जाणारी शेवटची लोकल २८ नोव्हेंबर रोजी रात्री ११ वाजून ५१ मिनिटांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुटणार आहे. तर कर्जतच्या दिशेने जाणारी शेवटची लोकल रात्री ११ वाजून ३० मिनिटांनी सुटेल. बदलापूरहून सीएसएमटीच्या दिशेने जाणारी शेवटची लोकल रात्री ११ वाजून २९ मिनिटांनी सुटणार आहे.

railway megablock news
Shocking : बाईक, सोन्याच्या अंगठीसाठी छळ; पोलीस ठाण्यात सासरच्यांविरुद्ध तक्रार केली, घरी परतली अन्....

ब्लॉक संपल्यानंतर पहाटे ३ वाजून ३५ मिनिटांनी कर्जतहून आणि ३ वाजून ४३ मिनिटांनी अंबरनाथहून सीएसएमटीच्या दिशेने लोकल सेवा सुरू होईल. ठाण्याहून कर्जतच्या दिशेने पहिली लोकल पहाटे ५ वाजता सुटणार आहे. याशिवाय चार मेल आणि एक्स्प्रेस गाड्या कर्जत-पनवेल-ठाणे मार्गे वळवण्यात येणार आहेत. या गाड्यांना कल्याणऐवजी प्रवाशांच्या सोयीसाठी पनवेल आणि ठाणे येथे थांबा देण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवाशांनी प्रवासापूर्वी रेल्वेचे वेळापत्रक तपासावे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.