Shocking : बाईक, सोन्याच्या अंगठीसाठी छळ; पोलीस ठाण्यात सासरच्यांविरुद्ध तक्रार केली, घरी परतली अन्....

Solapur Crime News : सोलापुरात ज्ञानेश्वरी जाधव यांची आत्महत्या. माहेरून दुचाकी आणि सोन्याची अंगठी आणण्यासाठी सासरच्या मंडळींकडून छळ होत असल्याची तक्रार. तक्रारीनंतर अवघ्या ४० मिनिटांत मृत्यू झाल्याने खळबळ.
Solapur Crime News
Solapur Crime News AI Image
Published On: 

विश्वभूषण लिमये, सोलापूर

माहेरून दुचाकी आणि सोन्याची अंगठी आणण्यासाठी सासरच्या मंडळींकडून होत असलेल्या त्रासाला कंटाळून २८ वर्षीय विवाहितेने आत्महत्या केली. सदर घटना सोलापुरातील पाथरुट चौक परिसरात घडली आहे. ज्ञानेश्वरी रोहित जाधव असे मृत महिलेचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे, छळाविरोधात पोलिसांत तक्रार दिल्यानंतर अवघ्या ४० मिनिटांत तिच्या मृत्यूची नोंद करण्यात आली.

धक्कादायक म्हणजे, कुटुंबाकडून छळाविरोधात पोलिसांत तक्रार दिल्यानंतर अवघ्या ४० मिनिटांत तिच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. ज्ञानेश्वरी जाधव हिने तिच्या तक्रारीमध्ये म्हटल्यानुसार , तिचा पती रोहित, सासरे विलास, सासू जयश्री आणि नणंद अश्विनी हे चौघेही तिच्याकडे माहेरून दुचाकी आणि सोन्याची अंगठी आणण्याची मागणी करत होते. ही मागणी पूर्ण न झाल्याने तिला वारंवार शिवीगाळ केली जात होती. तसेच दमदाटी करून तिचा शारीरिक आणि मानसिक छळ केला जात असल्याचा आरोप तिने केला आहे.

Solapur Crime News
Gold Rate Today : सोनं अचानक इतकं कसं महागलं? सुवर्णनगरीत दरांची मोठी झेप; चांदीचीही जोरदार मुसंडी

मे २०२४ पासून १२ सप्टेंबर २०२६ पर्यंत पुण्यातील वानवडी येथील केदारी नगर परिसरात हा त्रास सुरू असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या सततच्या त्रासाला कंटाळून ज्ञानेश्वरीने २१ नोव्हेंबर रोजी रात्री ८.३५ वाजता सदर बझार पोलीस ठाण्यात पतीसह सासरच्या मंडळींविरोधात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीवरून पोलिसांनी चारही जणांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला. मात्र, त्यानंतर अवघ्या ४० मिनिटांत म्हणजे रात्री ९.१५ वाजता ज्ञानेश्वरीच्या मृत्यूची माहिती पोलिसांना मिळाली.

Solapur Crime News
Shocking : लग्नाचे आश्वासन देऊन २९ वर्षीय महिलेवर अत्याचार, माजी सरपंचावर गुन्हा दाखल

पाथरुट चौकातील राहत्या घरात ज्ञानेश्वरीने छताच्या पंख्याला स्कार्फच्या साहाय्याने गळफास घेतल्याचे समोर आले. हा प्रकार लक्षात येताच तिचे वडील पांडुरंग यांनी तिला तातडीने अश्विनी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर तिला मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळी जाऊन तपासणी केली. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक पाटील करत आहेत. तक्रार दाखल केल्यानंतर काही वेळातच घडलेल्या या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.