Mega Block: पश्चिम रेल्वे मार्गावर शनिवार-रविवारी मेगा ब्लॉक; २५० लोकल रद्द; वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडा

Mumbai Local Western Railway 250 Train Cancelled on Saturday Sunday: मुंबईकरांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. पश्चिम रेल्वेवर शनिवारी-रविवारी मेगा ब्लॉक असणार आहे. यामुळे २५० लोकल रद्द असणार आहे.
Mega Block
Mega BlockSaam Tv
Published On
Summary

पश्चिम रेल्वेवर शनिवार- रविवारी मेगाब्लॉक

२५० पेक्षा जास्त रेल्वे रद्द

प्रवाशांनी घराबाहेर पडण्याआधी वेळापत्रक वाचा

रेल्वे प्रवाशांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. पश्चिम रेल्वेवर शनिवारी आणि रविवारी मेगा ब्लॉक असणार आहे. पश्चिम रेल्वेवर सहाव्या मार्गिकेचं काम सुरु आहे. गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेले हे काम सुरु झाले आहे. सध्या कांदिवली ते बोरिवलीदरम्यान सहाव्या मार्गिकेचं काम सुरु आहे. यानिमित्त ब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे जवळपास २५० पेक्षा जास्त लोकल फेऱ्या रद्द होणार आहे.

Mega Block
Central Railway: बदलापूर ते कर्जतदरम्यान दोन नव्या रेल्वे मार्गिका; रेल्वे मंत्रालयाने दिला ग्रीन सिग्नल; काम कधीपर्यंत पूर्ण होणार?

कांदिवली-बोरीवली सहाव्या मार्गिकेचं काम सुरु

शनिवार-रविवारी जर तुम्ही पश्चिम रेल्वेने प्रवास करण्याचा विचार करत असाल तर रेल्वेचं वेळापत्रक आधीच पाहून जा. हा ब्लॉक २० डिसेंबर २०२५ पासून सुरु झाला आहे. १८ जानेवारीपर्यंत हा मेगा ब्लॉक असणार आहे. यामुळे याआधीही शेकडो लोकल फेऱ्या रद्द झाल्या होत्या. त्यानंतर आता शनिवार-रविवारी २५० पेक्षा जास्त फेऱ्या रद्द होणार आहेत.यामुळे प्रवाशांना मात्र फटका बसणार आहेत.

पश्चिम रेल्वेच्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री ११.१५ पासून ते रात्री ३.१५ वाजेपर्यंत अप जलद मार्गावर आणि रात्री १ वाजल्यापासून ते ४.३०पर्यंत ब्लॉक असणार आहे. कांदिवली स्थानकावर पॉइंटची जोडणी करण्यासाठी हा ब्लॉक घेण्यात आला आहे.

Mega Block
Mumbai Local : लोकलमध्ये राडा ! राजेशने घराशेजारी राहणाऱ्या सिराजला गर्दीत गाठले, चाकूने छातीवर-पाठीवर सपासप वार केले

रविवारी रात्री कांदिवली आणि मालाड स्थानकादरम्यान डाउन जलद मार्गावर मोठा ब्लॉक असणार आहे. अप, डाउन जलद मार्गावर रात्री १ ते पहाटे ६.३० वाजेपर्यंत तर धीम्या मार्गावर रात्री १ ते पहाचे ४ वाजेपर्यंत ब्लॉक असणार आहे.

मेल एक्सप्रेसवरही परिणाम

पश्चिम रेल्वेवरील या मेगा ब्लॉकचा मेल एक्सप्रेस, लांब पल्ल्यांच्या गाड्यांवर परिणाम होणार आहे. अनेक एक्सप्रेस रद्द केल्या जाणार आहेत तर काही रेल्वे या उशिराने धावणार आहेत.

Mega Block
Navi Mumbai : नवी मुंबईच्या लॉजमध्ये नको ते उद्योग, पोलिसांनी उद्ध्वस्त केले देहविक्रीचं रॅकेट; ७ महिलांची सुटका

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com