Mumbai Local : लोकलमध्ये राडा ! राजेशने घराशेजारी राहणाऱ्या सिराजला गर्दीत गाठले, चाकूने छातीवर-पाठीवर सपासप वार केले

knife attack inside Mumbai local train : मुंबई लोकलमध्ये थरारक घटना घडली आहे. हार्बर मार्गावर धावत्या ट्रेनमध्ये शेजारी राहणाऱ्या तरुणावर चाकूने सपासप वार केले.
Mumbai Local
Mumbai Local Saam Tv
Published On

Mumbai local train knife attack Vashi : धावत्या लोकलमध्ये गर्दीमध्ये एका तरूणाने शेजारीच उभ्या असलेल्या तरूणावर चाकूने हल्ला केला. त्याने चाकूने छातीवर आणि पाठीवर सपासप वार केले अन् धावत्या लोकलमधून पळ काढला. हार्बर मार्गावर ही घटना घडली आहे. राजेश अरुणविहारी असे हल्ला करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. तर जखमी तरूणाचे नाव सिराज शेख असे आहे. धक्कादायक म्हणजे, दोघेही शेजारी राहतात, त्यामुळे अनेक वर्षांपासून एकमेकांना ओळखतात. अरूणविहारी याने हल्ला का केला? याचा तपास करण्यात येत आहे. पोलिसांनी अरूणविहारी याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. त्याचा शोध घेतला जात आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नवी मुंबईतील वाशी स्थानकाजवळ सीएसएमटी-पनवेल ट्रेनमध्ये मंगळवारी ही घटना घडली. धावत्या लोकलमध्ये २१ वर्षाच्या राजेश अरूणविहारी याने २४ वर्षाच्या सिराज शेख याच्यावर चाकूने अनेक वार केले. त्याच्या मानेवर, छातीवर आणि पाठीवर सपासप वार केले. या हल्ल्यात सिराज गंभीर जखमी आहे. त्याला जवळच्या रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या हल्ल्याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. हल्लोखोरावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Mumbai Local
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांचा या देशावर हल्ल्याचा आदेश, ISIS वर अमेरिकन सैन्याचा Airstrikes, पाहा व्हिडिओ

सिराज शेख याची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. सिराज याच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी राजेश याचे कुटुंबीय आले होते. यामुळे रूग्णालयात चौकशीसाठी आलेल्या पोलीसही चक्रावले होते. राजेश याने सिराज याच्यावर हल्ला का केला? याचा तपास करण्यात येत आहे. रेल्वे पोलिसांनी राजेशवर हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांची तीन पथके तयार करण्यात आली आहेत.

Mumbai Local
म्हातारचळ! ७० वर्षांच्या आजोबाने धावत्या बसमध्ये मुलाचं केलं लैंगिक शोषण, व्हिडिओमध्ये हैवानियत कैद

धावत्या लोकल ट्रेनमध्ये राजेश याने वारंवार चाकूने वार केले. सिराज याने आपल्यावरील हल्ल्याला प्रतिकार केला. लोकांनाही राजेशला रोखले. या झटापटीत राजेशही जखमी असल्याची माहिती मिळाली आहे. सिराज अब्दुल्ला शेख (वय २४) हा घणसोली येथील रहिवासी आहे. तो एका कॉल सेंटरमध्ये काम करतो. त्याच्या मानेला, छातीला, पाठीला आणि कंबरेला गंभीर दुखापत झाली आहे. त्याच्यावर सध्या मुंबईतील जेजे रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आम्ही कधीही भांडलो नाही. आम्ही अनेक दशकांपासून शेजारी आहोत, असे अरुणविहारीची आई राजलक्ष्मी म्हणाली.

Mumbai Local
Accident : चालकाला डुलकी लागली अन् कार पुलावरून कोसळली, ४ जणांचा जागीच मृत्यू, ५ गंभीर

राजेशने सिराजवर हल्ला का केला?

राजेश याने हल्ला का केला? याचा पोलिसांकडून तपास कऱण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राजेश अरूणविहारी हा एका महिलेचा सतत पाठलाग करत होता. त्या महिलेसोबत त्याचे एकदा तू तू मैं मैं झाले. त्यावेळी सिराज याने महिलेची बाजू घेत राजेशला सुनावले होते. हाच राग राजेशच्या मनात राहिला असेल. अरुणविहारीने कदाचित हाच राग बाळगून लोकल ट्रेनमध्ये सिराजवर हल्ला केला असावा, असा अंदाज पोलिसांकडून वर्तवला जात आहे.

Mumbai Local
CCTV Video : भावजय नगरसेवक कशी झाली? विजयी उमेदवाराच्या घराबाहेर कोयत्याने हल्ला, बीड पुन्हा हादरले

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com