Accident : चालकाला डुलकी लागली अन् कार पुलावरून कोसळली, ४ जणांचा जागीच मृत्यू, ५ गंभीर

Chandrapur road accident : चालकाला डुलकी आल्याने बोलेरो वाहन पुलाखाली कोसळले. या भीषण अपघातात ३ महिला आणि १३ वर्षाच्या मुलीचा जागीच मृत्यू झाला.
Chandrapur road accident
Chandrapur road accidentSaam TV Marathi News
Published On

संजय तुमराम, साम टीव्ही प्रतिनिधी

Chandrapur fatal road accident today : एका कार्यक्रमासाठी तेलंगणामधून महाराष्ट्रात आलेल्या वाहनाचा चंद्रपूरमध्ये भीषण अपघात झाला. चालकाला डोळा लागल्यामुळे वाहनावरील नियंत्रण सुटले अन् काळाने घाला घातला. या भीषण दुर्घटनेत १३ वर्षांची मुलगी आणि ३ महिलांचा जागीच मृत्यू झालाय. ५ जण गंभीर जखमी आहेत. त्यांच्यावर जवळच्या रूग्णालयात उपचार करण्यात येत आहे. अपघातानंतर महामार्गावर वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात झाली होती. पोलिसांनी तात्काळ धाव घेत बचावकार्य वेगात केले, अपघातग्रस्त वाहनाला बाजूला केलं अन् वाहतूक सुरळीत केली.

Chandrapur road accident
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्सप्रेस वे लोणावळ्यात जॅम, ताम्हिणी घाटातही वाहनांच्या रांगा

चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा तालुक्यातील सोंडो गावाजवळ महामार्गावर भीषण अपघातात झाला. यामध्ये चार महिलांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. या सर्व महिला तेलंगणा राज्यातील कागजनगर येथील असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. चालकाला अचानक डुलकी आल्यामुळे अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातग्रस्त वाहने बाजूला सारून वाहतूक सुरळीत केली.मृतदेह सध्या पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आले आहेत. स्थानिक पोलिसांनी अपघाताची नोंद केली आहे.

Chandrapur road accident
Mahapalika Elections : भाजप म्हणतंय पाठीत खंजीर खुपसला, शिवसैनिक म्हणाला स्वबळावर होऊन जाऊ द्या, कल्याणमध्ये नेमकं काय सुरू?

तेलंगणातील कागजनगर येथील काही लोक कार्यक्रमासाठी नागपूरला आले होते. हा कार्यक्रम संपल्यानंतर सर्वजण बोलेरो वाहनाने तेलंगणाकडे निघाले होते. त्याचवेळी पहाटेच्या सुमारास पुलावर चालकाला डुलकी आल्याने वाहन पुलाखाली कोसळले. या अपघातात वाहनातील पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळाली आहे. या अपघातामध्ये चालक बचावला आहे. मृतांमध्ये अफजल बेगम (55), सायरा बानो (45), सबरीन शेख (13), सलमा बेगम झांकीर हुसेन (46) यांचा समावेश आहे. सर्व जखमींना नागपूरच्या रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले आहे.

Chandrapur road accident
Bus Accident : धावत्या बसचा टायर फुटला, २ कारचा चुराडा, भीषण अपघातात ९ जणांचा मृत्यू

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com