Bus Accident : धावत्या बसचा टायर फुटला, २ कारचा चुराडा, भीषण अपघातात ९ जणांचा मृत्यू

Tamil Nadu Bus Accident: तामिळनाडूमध्ये सरकारी बसचा टायर फुटल्याने भीषण अपघात झाला असून दोन कारला धडक दिल्याने ९ जणांचा मृत्यू तर चार जण गंभीर जखमी झाले आहेत.
Bus accident
Bus accidentSaam TV Marathi News
Published On

Tamil Nadu government bus tyre burst accident : धावत्या बसचा टायर फुटल्याने तामिळनाडूमध्ये भीषण अपघात झाला. या भयानक अपघातामध्ये ९ जणांचा मृत्यू झाला. तिरुचिरापल्लीहून चेन्नईला जाणाऱ्या सरकारी बसचा अचानक टायर फुटल्याने चालकाचे नियंत्रण सुटले अन् विरूद्ध दिशेला जाऊन दोन कारला जोरात धडक दिली. या धडकेत ९ जणांचा जागीच मृत्यू झाला. तर दोन मुलांसह चार जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी जवळच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

तिरुचिरापल्लीहून सरकारी बस चेन्नईला निघाली होती. महामार्गावरून बस वेगात होती. पण अचानक बसचा टायर फुटला अन् चालकाचे नियंत्रण सुटले. बस डिव्हायडर ओलांडून थेट विरूद्ध दिशेला जाऊन दोन वाहनांना जोरात धडकली. एसयूव्ही आणि कार चेन्नईहून तिरुचिरापल्लीला निघाल्या होत्या, पण त्याचवेळी बसने जोरात धडक दिली.ही धडक इतकी भयानक होती की दोन्ही कारचा चक्काचूर झाला. यामध्ये कारमधील ९ जणांचा मृत्यू झाला. तर ४ जण जखमी झाले. अपघातानंतर महामार्गावर वाहतूककोंडी झाली. अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेतली. पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने बाजूला केली. जखमींना तातडीने जवळच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Bus accident
Bus Accident : हायवेवर अग्नितांडव! कंटेनरनं स्लीपर बसला उडवले, गाढ झोपेत असलेल्या १७ जणांचा कोळसा

पोलीस अधिकाऱ्याने पीटीआयला अपघातानंतर सांगितले की, मृतांपैकी ७ जण हे खासगी वाहनातील प्रवासी होते. तर दोघांचा मृत्यू जोरात धडकेमुळे झाला. या अपघातामध्ये अनेकजण जखमी झाले आहेत. त्यापैकी ४ जणांची प्रकृती गंभीर आहे. जखमी मुलांना जवळच्या सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात असून त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत.

Bus accident
Mahapalika Elections : भाजप म्हणतंय पाठीत खंजीर खुपसला, शिवसैनिक म्हणाला स्वबळावर होऊन जाऊ द्या, कल्याणमध्ये नेमकं काय सुरू?

तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांनी या अपघाताबाबत दुःख व्यक्त केले. मुख्यमंत्र्यांनी जखमींना सर्वोत्तम वैद्यकीय सेवा देण्याचे निर्देश अधिकार्‍यांना दिले. दरम्यान, मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ३ लाख रूपयांची आणि जखमींना एक लाख रूपयांची मदत जाहीर केल्याचे सरकारकडून जाहीर करण्यात आले आहे. मृतांमध्ये पाच पुरुष आणि चार महिलांचा समावेश आहे.पोलिसांनी अपघाताचा तपास सुरू केला आहे. टायर फुटण्याच्या परिस्थितीचा आणि टक्कर होण्याआधीच्या घटनांचा तपास केला जात आहे. बस चालकाचा जबाब नोंदवण्यात आलाय.

Bus accident
Shiv Sena MNS alliance : "कोण किती जागा लढवणार, आकडा काय?" राज ठाकरेंनी भाजपला चिमटा काढला

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com