Shiv Sena MNS alliance : "कोण किती जागा लढवणार, आकडा काय?" राज ठाकरेंनी भाजपला चिमटा काढला
Shiv Sena MNS Seat sharing formula : दोन दशकानंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले. मुंबई, नाशिकसह काही महत्त्वाच्या महापालिकेत शिवसेना-मनसे एकत्र लढणार आहेत. मनसे-शिवसेना युतीवर आज अधिकृत शिक्कामोर्तब झाले. पत्रकार परिषदेत राज ठाकरेंनी जागा वाटपावर मिष्कील वक्तव्य केले.
कोण किती जागा लढवणार, आकडा काय.. हे आम्ही तुम्हाला सांगणार नाही, असे म्हणत राज ठाकरेंनी त्याचे कारणही सांगितले. ते म्हणाले की, महाराष्ट्रामध्ये सध्या लहान मुले पळवणाऱ्या टोळ्या फिरताता. त्यामध्ये दोन राजकीय टोळ्यांची भर पडली.ते राजकीय पक्षातील मुले , उमेदवाराला पळवातात. असा टोला राज ठाकरेंनी लगावला. निवडणुका लढवणाऱ्या सर्व उमेदवाराला दोन्ही पक्षाकडून उमेदवारी दिली जाईल. अर्ज कधी भरायचे ते आपल्याला कळवले जाईल, असे राज ठाकरे म्हणाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.
