Pune Politics: "मूळ पुणेकरांचा" कौल कोणाला! पुण्यातील शनिवार, नारायण पेठांवर भाजप वर्चस्व राखणार?

Pune Corporation Election: पुणे महापालिका निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष आहे. शनिवार आणि नारायण पेठ सारख्या भागात 'मूळ पुणेकर' आहेत. ते कोणाला सत्ता देणार. या भागात भाजप आपले वर्चस्व टिकवून ठेवेल की राजकीय समीकरणे बदलतील?
Pune Corporation Election
High political excitement in Pune as the historic Shaniwar–Narayan Peth region becomes the key battleground in the municipal elections.saamt v
Published On
Summary
  • पुणे महापालिकेच्या निवडणुकीत प्रभाग २५कडे लक्ष वेधलं

  • शनिवार, नारायण आणि सदाशिव पेठेतील “ओरिजनल पुणेकर” मतदार निर्णायक

  • भाजप वर्चस्व कायम राहणार की समीकरण बदलेल?

तब्बल ९ वर्षाने होणाऱ्या पुणे महापालिकेच्या निवडणुकीतून १६५ नगरसेवकांची निवड केली जाणार आहे. पुण्यात एकूण ४१ प्रभाग आहेत ज्यामध्ये प्रत्येक प्रभागाची एक वेगळी ओळख आहे. पुणे शहरातील शनिवार, नारायण आणि सदाशिव (काही भाग) असा कट्टर आणि "ओरिजनल" पुणेकरांचा प्रभाग कुठला असं कोणी विचारलं तर तो म्हणजे प्रभाग क्रमांक २५. प्रभाग क्रमांक २५ म्हणजे पुण्यातील प्रमुख पेठा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नारायण, शनिवार आणि सदाशिव सारख्या पेठांचा भाग.

Pune Corporation Election
Maharashtra Politics: शिवसेनेचा दे धक्का, संदीप धुरींनंतर आणखी एका शिलेदारानं सोडली राज ठाकरेंची साथ

या भागात अगदी श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिर यासह ऐतिहासिक स्थळांमध्ये केसरी वाडा, शनिवार वाडा, विश्रामबाग वाडा यासह पुणे शहराचा वारसा जपणाऱ्या अनेक जागा आहेत. पुणेरी पाट्या, पाट्यांवरुन केलेले विनोद, एक ते चार विश्रांतीची वेळ असल्याने वामकुक्षी घेणाऱ्यांना बोलले जातं तोच हा भाग. बोलण्याची विशिष्ट पद्धत, खाद्यसंस्कृतीवर प्रेम आणि पारंपरिक पेठांमधील खरेदीचे वेड यांसारखी लक्षणे पाहावी लागतील, जे त्यांच्या जीवनशैलीतून दिसतात तेच चोखंदळ पुणेकर इथे गेल्या वर्षानुवर्ष इथे राहतात.

Pune Corporation Election
मोठी बातमी! ऐन निवडणुकीत भाजपच्या माजी नगरसेवकासह २७ पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी, राजकारणात खळबळ

आता जेवढी यांचे शिस्त, राहणीमान आहे तेवढाच कटाक्षाने हे मतदान सुद्धा करतात बरं का! त्यामुळे इथल्या मतदारांना कुठलीही प्रलोभने दाखवली तरी त्याचा काही उपयोग नसतो. त्यांना हवा असतो तो शब्द आणि शब्द पूर्ण करणारा नगरसेवकाच्या रूपातील व्यक्ती. पेठेतील वाढती वाहतूक कोंडी, अनाधिकृत बांधकाम, कचऱ्याचे नियोजन, केबल चे जाळे, पार्किंग अशा काही समस्या येथील नागरिकांच्या आहेत. २०१७ मध्ये झालेल्या पालिका निवडणुकीत सुद्धा याठिकाणी भाजप चे सर्व ४ नगरसेवक विजयी झाले होते.

यंदा सुद्धा पुण्यातील प्रभाग क्रमांक २५ शनिवार पेठ – महात्मा फुले मंडई या ठिकाणी भाजप ने निवडणुकीत तरुणांना संधी देण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला. निवडणुकीसाठी या प्रभागात स्वरदा बापट, कुणाल टिळक, राघवेंद्र मानकर आणि स्वप्नाली पंडित यांना भाजप ने उमेदवारी दिली आहे.

स्वरदा बापट, दिवंगत खासदार गिरीश बापट यांची सून

प्रभाग क्रमांक २५ मधून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या दिवंगत खासदार गिरीश बापट यांच्या सूनबाई स्वरदा बापट या उच्चशिक्षित आहेत. कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठातून त्यांनी शिक्षण घेतले असून त्या एलएलएम आहेत. पुणे महापालिकेची निवडणूक त्या पहिल्यांदाच लढत असल्या तरी सुद्धा १२ वर्षापूर्वी सांगली महापालिकेची निवडणूक त्यांनी लढविली आहे. एकही गुन्हा दाखल नसलेल्या स्वरदा बापट यांची एकूण ११ कोटी २ लाख रुपयांची मालमत्ता आहे.

भाजपच्या राज्य उपाध्यक्ष नीता केळकर यांच्या त्या कन्या आहेत. स्वरदा यांचे वडील श्रीरंग केळकर सांगलीत व्यावसायिक आहेत. गिरीश बापट यांचे निधन झाल्यावर स्वरदा बापट यांनी "पक्ष देईल ती जबाबदारी पार पाडू" अशी स्पष्ट भूमिका घेतली होती. स्वरदा यांनी भारतीय जनता युवा मोर्चाची उपाध्यक्षा म्हणूनही काम पाहिलं आहे.

कुणाल टिळक, दिवंगत आमदार आणि महापौर मुक्ता टिळक यांचे सुपुत्र

कुणाल टिळक हे पुण्याच्या माजी महापौर दिवंगत मुक्ता टिळक यांचे सुपुत्र आहेत. मुक्ता टिळक या कसबा विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सुद्धा होत्या. पुण्यातील एस पी महाविद्यालयातून शिक्षण घेतलेल्या कुणाल यांनी पुणे विद्यापीठातून बीबीएची पदवी घेतली आहे. त्याशिवाय त्यांनी एल. एल. एम आंतरराष्ट्रीय संबंध, कायदे आणि सुरक्षा याचे शिक्षण इंग्लंड मधून पूर्ण केलं. आई राजकारणात असल्याने कुणाल यांच्यावर स्वाभाविक लहानपणापासूनच राजकीय संस्कार झाले आहेत.

परंपरागत भाजपचा असलेला कसबा मतदार संघाच्या आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर या जागेवर उमेदवारी कुणाल टिळक यांना मिळेल अशी चर्चा असतानाच भाजप ने हेमंत रासने यांना उमेदवारी दिली आणि त्यांचा पराभव झाला. पुढे २०२४ मध्ये हा मतदारसंघ पुन्हा रासने यांनी भाजपकडे आणला. युनिव्हर्सिटी ऑफ स्टरॅथक्लायेद, इंग्लंडचा विद्यार्थी राजदूत म्हणून काम केलेल्या कुणालकडे भाजप युवा मोर्चाचा उपाध्यक्ष पदाची जबाबदारी होती.

राघवेंद्र मानकर

भाजप युवा मोर्चाचे शहराध्यक्ष पद भूषवलेल्या राघवेंद्र मानकर यांना पक्षाकडून उमेदवारी मिळाली आहे. सध्या ते भारतीय जनता पक्ष, पुणे शहराचे सरचिटणीस म्हणून कार्यरत आहेत. भाजपकडे तरुणाईला आकर्षित करून त्यांचे संघटन मजबूत करण्याचं काम करणाऱ्या मानकर प्रभाग २५ मधून निवडणूक लढवणार आहेत. कोविड काळात रेमडेसेव्हिर औषध मिळवण्यासाठी त्यांच्या आंदोलनाची संपूर्ण राज्यात चर्चा झाली होती. पुण्यातील पहिल्या २४ तास जनसंपर्क कार्यालय त्यांनी सुरू केलं. गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांमध्ये त्यांचा मोठा जनसंपर्क आहे.

Pune Corporation Election
Sangli Politics: ऐन निवडणुकीत अजित पवारांना मोठा धक्का; उमेदवारावरच थेट हद्दपारीची कारवाई

स्वप्नाली पंडित

हिंदुदुत्वाचे बाळकडू स्वप्नाली यांना १९९२ मध्येच मिळालं होतं. त्यांचे वडील चंद्रकांत सकपाळ अयोध्येतील बाबरी मशिद पाडण्यात विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या वतीने सहभागी झाले होते. स्वप्नाली या वाणिज्य शाखेची (B.COM) पदवीधर आहेत. त्यांचे पती नितीन पंडित हे तुळशीबाग गणपती मंडळाचे कोषाध्यक्ष आहेत. पेठांमध्ये तसेच मध्यवर्ती भागात असलेल्या अनेक बाजार पेठांमध्ये स्वप्नाली पंडित यांची चांगली ओळख तसेच गेली 25 वर्ष सामाजिक काम असल्याने भाजप ने त्यांना उमेदवारी दिली आहे.

कशी आहे पुण्यातील प्रभाग क्रमांक २५ मध्ये लढत?

अ (मागास प्रवर्ग महिला)

स्वप्नाली नितीन पंडित (भाजप)

रूपाली ठोंबरे पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार)

अमृता भोकरे (मनसे)

ब (मागास वर्ग)

राघवेंद्र मानकर (भाजप)

समीर गायकवाड (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष)

मंदार कारंडे (अपक्ष)

मनोज पाटील (अपक्ष)

क (सर्वसाधारण महिला)

स्वरदा बापट (भाजप)

ऍड राधिका कुलकर्णी (राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार)

शीतल पायगुडे (राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष)

अक्षता निलेश धुमाळ शिंदे (शिवसेना)

ड (सर्वसाधारण)

कुणाल टिळक (भाजप)

संदीप जाधव (राष्ट्रवादी)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com