

जळगावच्या राजकारणात भाजपची मोठी कारवाई
माजी नगरसेवकासह २७ पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी
ऐन निवडणुकीत घेतलेल्या निर्णयामुळे खळबळ
जळगावच्या राजकारणात मोठी खळबळ उडवून देणारी घटना घडलीय. ऐन महापालिका निवडणुकीच्या काळात भाजपनं २७ पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी केलीय. भाजपनं केलेल्या कारवाईमुळे जिल्ह्यातील राजकारणासह राज्यातही खळबळ उडलीय.
राज्यातील २९ महापालिकांमध्ये आपल्या सत्ता येण्यासाठी भाजप नेत्यांकडून प्रचाराचा धुरळा उडवलाय. स्वत: राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जागोजागी जात प्रचार सभा घेत आहेत. युपीमधीलही भाजपचे दिग्गज नेते प्रचारासाठी महाराष्ट्रात येणार आहेत. त्याच भाजपच्या हायकमांडनं पक्षातील पदाधिकाऱ्यांची हाकालपट्टी केली आहे.
जळगाव महानगरपालिकेत महायुती धर्म न पाळणाऱ्या भाजपच्या बंडखोरांवर पक्षाने कारवाई आहे. जळगाव महानगरपालिकेत युतीधर्म न पाळणाऱ्या भारतीय जनता पार्टीच्या बंडखोरांवर पक्षातर्फे कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये भाजपचे माजी नगरसेवक रंजना सपकाळे, कांचन सोनवणे चेतना चौधरी ,जितेंद्र मराठे यांच्यासह भाजपाचे बंडखोर सदस्य यांची पक्षातून हकलपट्टीची कारवाई करण्यात आली आहे.
भाजपकडून करण्यात आलेल्या शिस्तभंगाच्या कारवाईमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडालीय. भाजपच्या नावाचा आणि पक्षाच्या प्रतिमेचा गैरवापर करत काही अपक्ष उमेदवार हे मतदारांची दिशाभूल करत असल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला होता.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.