

मुंबई गोवा महामार्गाच्या कामाची अपडेट
माणगाव इंदापूर बायपासचे काम सुरु
गणेशोत्सावाआधी सुरु करण्याचा मानस
मुंबई गोवा एक्सप्रेस वेचं काम प्रगतीपथावर सुरु आहे. मुंबई गोवा एक्सप्रेस वे लवकरच सुरु करण्यासाठी काम जोरात सुरु आहे. सध्या माणगाव ते इंदापूर बायपासचे काम सुरु आहे. मानगाव ते इंदापूर बायपास सोडून मुंबई गोवा हायवेचे काम मेपर्यंत पूर्ण होणार आहे. याबाबत मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी माहिती दिली आहे.
मुंबई गोवा हायवेचं काम कधी पूर्ण होणार असा प्रश्न कोकणवासीयांना आहे. पुढील गणेशोत्सवाआधी हा महामार्ग पूर्ण होईल, असं आश्वान मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी दिलं आहे.
२०२७ पर्यंत काम पूर्ण होणार
आमदार निरंजन डावखरे यांनी मुंबई पुणे एक्सप्रेस वेच्या कामाबद्दल प्रश्न उपस्थित केला. त्यांनी सांगितले की, हा महामार्ग जगातील सर्वात जास्त काळापासून बांधकाम सुरु असणारा रस्ता आहे. त्यानंतर अटल सेतू आणि समृद्धी महामार्गाचे काम पूर्ण झाले. मात्र, या रस्त्याचे काम रखडल्याचे दिसते. यावर उत्तर देताना शिवेंद्रराजे भोसले यांनी सांगितले की, माणगाव बायपासवरील रेल्वे उड्डाणपूलचे काम नवीन एजन्सीद्वारे सुरु आहे. हे काम लवकरच पूर्ण होईल.
सध्या कामाची स्थिती काय?
शिवेंद्रराजे भोसले यांनी सांगितले की, माणगाव आणि इंदापूर बायपाससह तीन रेल्वे उड्डाणपूल आणि दोन मोठे पूल समाविष्ट आहेत. काम २०२५ मध्ये सुरु झाले आहे. काम जुलै २०२७ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. संबंधित कंत्राटदार काम करत नव्हते. त्यामुळे नवीन एजन्सीकडे काम देण्यात आले आहे. त्यांनाही गणेशोत्सवाआधी काम पूर्ण करण्यास सांगितले आहे. पावसळ्यापूर्वी मे महिन्यापर्यंत माणगाव-महाड रस्त्यावरील ताम्हिणी बायपासचे काम पूर्ण करण्याचे लक्ष्य आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.