मुंबईत पाऊस तीन आठवडे उशिरा दाखल झाला. मात्र पहिल्या चार दिवसातच महापालिकेच्या उपाययोजनांची आणि नगर नियोजनाची पुरती पोलखोल केलीय. आधी चेंबूर, त्यानंतर आरे कॉलनी आणि कुर्ल्यातील फिनिक्स मॉल भागात झाडं पडून तीन जणांचा मृत्यू झालाय. एवढंच नाही तर चार दिवसात मुंबईत ७०० पेक्षा जास्त झाडं पडल्याचा प्रकार समोर आलाय. मात्र या झाडं पडण्याच्या घटनेला सिमेंट काँक्रीटीकरणाचे रस्ते कारणीभूत असल्याचं अभ्यासकांचं मत आहे. सिमेंटचे रस्ते झाडांसाठी स्लो पॉयझन ठरत असल्याचं अभ्यासकांनी म्हटलं आहे.
फक्त पर्यावरण अभ्यासकच नाही तर एकमेकींच्या समोर उभे ठाकणाऱ्या मुंबई महापालिकेच्या महापौर रितू तावडे आणि विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांचंही झाडं कोसळण्याच्या घटनांबाबत एकमत झालंय. झाडं पडण्याच्या घटनेला सिमेंटचे रस्ते कारणीभूत असल्याचा दावा केलाय. एवढंच नाही तर याविरोधात रणशिंग फुंकण्याचा इशाराच पेडणेकर यांनी दिला आहे.
खरंतर २०२२ मध्ये एकनाथ शिंदेंनी मुंबईतील 2050 किलोमीटरचे रस्ते कॉंक्रिटीकरण करण्याचा निर्णय घेतला. त्यापैकी १५०० किलोमीटर रस्त्याचं काम पूर्ण किंवा प्रगतीपथावर आहे.
२०२२-२३
रस्ते काँक्रीटीकरणसाठी २२०० कोटी
२०२३-२४
रस्ते काँक्रीटीकरणसाठी २८२५ कोटी
२०२४-२५
रस्ते काँक्रीटीकरणसाठी ३२०० कोटी
२०२५-२६
रस्ते काँक्रीटीकरणसाठी ५१०० कोटी
२०२६-२७
रस्ते काँक्रीटीकरणसाठी ५२०० कोटी
मुंबईला खड्डेमुक्त करण्यासाठी काँक्रिटचे रस्ते बनवले जात आहेत, पण हेच रस्ते आता मुंबईकरांचा जीव घेऊ लागले आहेत. जर वेळीच झाडांना या काँक्रिटच्या विळख्यातून मुक्त केलं नाही, तर येणारा पावसाळा मुंबईकरांसाठी आणखी धोकादायक ठरू शकतो. त्यामुळे सरकार आता तरी मुंबईकरांना सुरक्षित जीवन देण्यासाठी रस्त्याचं काँक्रीटीकरण धोरण बदलण्यात येणार का? याकडे राज्याचं लक्ष लागलंय
मुंबईला खड्डेमुक्त करण्यासाठी काँक्रिटचे रस्ते बनवले जात आहेत, पण हेच रस्ते आता मुंबईकरांचा जीव घेऊ लागले आहेत. मुंबईत रस्त्याच्या कडेला १ लाख ८५ हजार झाडं आहेत. आता काँक्रीटीकरणामुळे झाडांच्या मुळांचा श्वास गुदमरत असल्यानं ही या सगळ्याच झाडांवर आणि पर्यायाने मुंबईकरांच्या जगण्यावर संकट आल्याचं म्हटलं जातंय. त्यामुळे जर वेळीच झाडांना या काँक्रिटच्या विळख्यातून मुक्त केलं नाही, तर येणारा पावसाळा मुंबईकरांसाठी आणखी धोकादायक ठरू शकतो. त्यामुळे सरकार आता तरी मुंबईकरांना सुरक्षित जीवन देण्यासाठी रस्त्याचं काँक्रीटीकरण धोरण बदलण्यात येणार का? याकडे राज्याचं लक्ष लागलंय
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.