pune Navale Bridge Accident : पुण्यातील नवले पुलाखाली सिमेंट टँकर उलटलाय. चालकाचं नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झालाय. या अपघातात एका दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झालाय़. अपघातग्रस्त टँकर चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.
पुण्यातील नवले पुलाखाली सिमेंट टँकर पलटी झाला. मध्यरात्री झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. कात्रज बायपास रस्त्यावरून सिमेंटने भरलेला दहा टायर टँकर वेगाने येत असताना चालकाचे नियंत्रण सुटले. टँकर नवले पुलाखाली पलटी झाला.
या दरम्यान रस्त्यावरून जात असलेली दुचाकी टँकरखाली अडकली. या दुर्घटनेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. रामेश्वर मच्छिंद्र उगले (वय ३१) असे अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. अपघातग्रस्त टँकर चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.