शरद पवारांची राष्ट्रवादी NDAसोबत जाणार? महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप? सुप्रिया सुळे-तावडेंच्या 21 भेटी

Maharashtra Politics: फोडाफोडीच्या राजकारणाची महाराष्ट्राला सवयच झालीय... अशातच ठाकरेसेनेतील फुटीनंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीत नवीन चाचपणी सुरु झालीय... पवारांची राष्ट्रवादी NDAसोबत जाणार असल्याची चर्चा रंगलीय...या चर्चेला तोंड कसं फुटलं ? आणि मित्रपक्षातील नेत्यानचं या चर्चेला कसा दुजोरा दिलाय? पाहूयात या रिपोर्टमधून...
Speculation rises in Maharashtra politics after reports of a meeting between NCP leader Jayant Patil and BJP’s Vinod Tawde, sparking talks of a possible NCP-NDA alliance.
Speculation rises in Maharashtra politics after reports of a meeting between NCP leader Jayant Patil and BJP’s Vinod Tawde, sparking talks of a possible NCP-NDA alliance.saam tv
Published On

महाराष्ट्राच्या राजकारणात कधी काय होईल, याचा काही नेम नाही. कालपर्यंत शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं काँग्रेसमध्ये विलिनीकरण होणार अशा चर्चा रंगल्या होत्या. या चर्चा शांत होत नाहीत तोवर आता पवारांच्या राष्ट्रवादीच्या नव्या घरोब्यासाठी हालचाली सुरू असल्याचं नवी चर्चा आता रंगू लागलीय. पवारांची राष्ट्रवादी थेट एनडीएमध्ये सामील होणार असल्याचं बोललं जातंय. आणि याला कारण ठरलयं... पवारांच्या एका विश्वासू आणि पक्षातील ज्येष्ठ नेत्याची भाजपच्या ज्येष्ठ नेत्यासोबत झालेली बैठक...राष्ट्रवादीचे जयंत पाटील आणि भाजपचे महासचिव विनोद तावडे यांच्यात गुप्त बैठक झाल्याची चर्चा आहे...विशेष म्हणजे या हालचालींना काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांनी दुजोरा दिलाय.

सध्या शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडे 8 लोकसभा खासदार आणि 10 आमदार आहेत. भाजपसोबत जाण्याच्या या संभाव्य निर्णयावर पक्षातील लोकप्रतिनिधींमध्ये दोन वेगवेगळे प्रवाह असल्याचं बोललं जातंय...ते काय आहेत ते पाहूयात...

एका बाजूला काही नेते महाविकास आघाडीतच राहण्यास अनुकूल आहेत, तर दुसरीकडे सत्तेत सहभागी होऊन आगामी निवडणुकांना सामोरं जावं, असा आग्रहही एका गटाचा असल्याची चर्चा आहे... त्यातही शरद पवारांची राष्ट्रवादी दोन पर्यायांची चाचपणी करतयं... पहिला पर्याय आहे एनडीए आघाडीत अधिकृतपणे सामील होऊन थेट मंत्रिपदं मिळवायचे...किंवा महायुतीत थेट न जाता, बाहेरून सरकारला अनुकूल भूमिका घेऊन महत्त्वाच्या मुद्द्यांवर सरकारला मदत करायची असा दुसरा पर्याय शरद पवारांच्या राष्ट्रवादीपुढे आहे...

दरम्यान राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी यावर अत्यंत मिश्किल टिप्पणी केलीय..भाजप नेते विनोद तावडे आणि जयंत पाटील यांच्यातील बैठकीवर प्रश्न विचारला असता, सुप्रिया सुळेंनी काय उत्तर दिलं ते पाहूया,..

सुप्रिया सुळेंनी एनडीएसोबत जाण्याच्या चर्चा फेटाळल्या असल्या, तरी 'भविष्यात आम्हाला सत्ता घ्यावीच लागेल' हे सूचक विधान त्यांनी केलंय. आता 2029 च्या निवडणुकीआधी पवारांची राष्ट्रवादी मविआतून बाहेर पडणार की मविआसोबत राहून सत्ताधाऱ्यांविरोधात निवडणुक लढवणार? हे पाहणं महत्त्वाचं आहे....

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com