Costal Road: कोस्टल रोडच्या बोगद्यात धावत्या कारने घेतला पेट, परिसरात धुरांचे लोट; दोन्ही मार्गिका बंद केल्याने वाहतूक कोंडी| VIDEO

Moving Car Catches Fire Inside Tunnel Of Costal Road : कोस्टल रोडवर आज बर्निंग कारचा थरार पाहायला मिळाला. या घनटेनंतर एकच खळबळ उडाली. या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे.
Costal Road: कोस्टल रोडच्या बोगद्यात धावत्या कारने घेतला पेट, परिसरात धुरांचे लोट; दोन्ही मार्गिका बंद केल्याने वाहतूक कोंडी| VIDEO
Moving Car Catches Fire Inside Tunnel Of Costal Road Saam Tv
Published On
  • मुंबईच्या कोस्टल रोड बोगद्यात धावत्या कारला अचानक आग लागली

  • बोगद्यात धुराचे मोठे लोट पसरल्याने दोन्ही मार्गिका तात्पुरत्या बंद करण्यात आल्या

  • हाजी अली ते वरळी दरम्यान मोठी वाहतूक कोंडी झाली

  • अग्निशमन दल आणि पोलीस घटनास्थळी दाखल

मुंबईतल्या कोस्टल रोडच्या बोगद्यामध्ये कारने पेटल घेतला. बोगद्याच्या आतमध्ये गेल्यानंतर कारला अचानक आग लागली आणि बघता बघता संपूर्ण कार आगीत जळून खाक झाली. या घटनेमुळे कोस्टर रोडच्या बोगद्यात धुराचे लोट पसरले आहेत. या घटनेनंतर कोस्टल रोडच्या दोन्ही मार्गिका बंद करण्यात आल्या आहेत. त्यामुळे परिसरात मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. या घटनेनंतर वाहन चालकांनी आपली वाहनं सोडून पळ काढला. कोस्टल रोडवर गोंधळाचे वातावरण आहे.

दुपारी १२.२५ वाजता कोस्टल रोडच्या बोगद्यामध्ये कारला आग लागली. हाजीअली ते वरळी दरम्यान कारने पेट घेतला. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. कोस्टल रोडच्या दोन्ही मार्गिका बंद करण्यात आल्यामुळे परिसरात मोठी वाहतूक कोंडी झाली आहे.

Costal Road: कोस्टल रोडच्या बोगद्यात धावत्या कारने घेतला पेट, परिसरात धुरांचे लोट; दोन्ही मार्गिका बंद केल्याने वाहतूक कोंडी| VIDEO
Mumbai News: मुंबईत पावसाचा चौथा बळी, चालत्या दुचाकीवर झाडाची फांदी कोसळली; १८ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू

कोस्टल रोड परिसरात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. वाहतूक कोंडीमुळे अग्निशमन दलाला घटनास्थळी पोहचण्यासाठी अडथळे येत आहेत. बोगद्यात मोठ्या प्रमाणात धुराचे लोट असल्यामुळे आग विझवण्यात देखील अडचण येत आहे. ही आग नेमकी कशामुळे लागली यामागचे कारण समोर आले नाही.

Costal Road: कोस्टल रोडच्या बोगद्यात धावत्या कारने घेतला पेट, परिसरात धुरांचे लोट; दोन्ही मार्गिका बंद केल्याने वाहतूक कोंडी| VIDEO
Mumbai News: मुंबईकरांसाठी गुड न्यूज! 'या' ठिकाणच्या झोपडपट्ट्यांचा होणार पुनर्विकास, ८५००० नागरिकांना मिळणार बिल्डिंगमध्ये घर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com