Mumbai News: मुंबईकरांसाठी गुड न्यूज! 'या' ठिकाणच्या झोपडपट्ट्यांचा होणार पुनर्विकास, ८५००० नागरिकांना मिळणार बिल्डिंगमध्ये घर

Mumbai Slum Redevelopment: मुंबईचा कायापालट होणार आहे. मुंबईतील अनेक झोपडपट्ट्यांचा पुनर्विकास होणार आहे. ८५००० नागरिकांना बिल्डिंगमध्ये घर मिळणार आहे.
Mumbai News: मुंबईकरांसाठी गुड न्यूज! 'या' ठिकाणच्या झोपडपट्ट्यांचा होणार पुनर्विकास, ८५००० नागरिकांना मिळणार बिल्डिंगमध्ये घर
Mumbai Slum RedevelopmentSaam Tv
Published On
  • मुंबई एसआरएकडून पुनर्विकास केला जाणार

  • मुंबईतील ४ झोपडपट्ट्यांचा पुनर्विकास होणार

  • ८५००० नागरिकांना मिळणार बिल्डिंगमध्ये घर

संजय गडदे, मुंबई

मुंबईतील झोपडपट्टी पुनर्विकासाला मोठी चालना देत झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने (SRA) अंधेरीनंतर आता वांद्रे बेहरामपाडा, जोगेश्वरी मजास वाडी, वडाळा अँटॉप हिल आणि शिवाजीनगर-गोवंडी येथे समूह क्षेत्र पुनर्विकास (क्लस्टर डेव्हलपमेंट) योजना राबविण्याची प्रक्रिया वेगाने सुरू केली आहे.

या चारही प्रकल्पांत अंदाजे एकूण ९७५ एकर क्षेत्रावर क्लस्टर योजना साकारली जाणार असून किमान ८५ हजार झोपडीधारकांना इमारतीत घर बांधून मिळणार आहे. शिवाय यात काही सोसायटी यांची वाढ झाली तर घरांची संख्या वाढण्याची ही शक्यता एसआरएफ प्राधिकरणातील अधिकाऱ्यांनी व्यक्त केले आहे.

वांद्रे पूर्वेकडील बेहरामपाडा परिसरातील सुमारे १५० एकर क्षेत्रात अंदाजे १२ हजार झोपड्या व परिसरातील काही सोसायट्यांचा समावेश करण्यात येणार आहे. जोगेश्वरीतील मजास वाडीच्या २२५ एकर क्षेत्रात सुमारे ५१ हजार झोपड्या आणि शेजारील इमारतींचा समावेश होणार आहे.

अँटॉप हिल-वडाळा परिसरातील ३०० एकर क्षेत्रात अंदाजे ६५ हजार झोपड्या, तर शिवाजीनगर-गोवंडी येथील ३०० एकर क्षेत्रात सुमारे ५७ हजार झोपड्या आणि काही इमारतींचा क्लस्टर योजनेत समावेश करण्यात येणार आहे. भविष्यात आणखी सोसायट्या सहभागी झाल्यास घरांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

Mumbai News: मुंबईकरांसाठी गुड न्यूज! 'या' ठिकाणच्या झोपडपट्ट्यांचा होणार पुनर्विकास, ८५००० नागरिकांना मिळणार बिल्डिंगमध्ये घर
Mumbai News: मॅनहोलमध्ये 'तो' माणूस कसा पडला? १० सेकंदाचा थरारक सीसीटीव्ही VIDEO आला समोर

दरम्यान, अंधेरीतील १०१ एकर क्षेत्रावरील क्लस्टर प्रकल्पाची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून, सुमारे २८ हजार घरांची निर्मिती प्रस्तावित आहे. या प्रकल्पाला शासनाची मंजुरी मिळाली असून, विकासकाला देकारपत्र देणे, दोन वर्षांचे एकत्रित भाडे जमा करणे, तिसऱ्या वर्षाचा पीडीसी आणि इतर आवश्यक अटींची पूर्तता झाल्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे.

SRAने चारही नव्या प्रकल्पांच्या सीमा निश्चित केल्या असून, झोपड्यांचे सर्वेक्षण अंतिम टप्प्यात आहे. हे प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर हजारो कुटुंबांना आधुनिक घरे, दर्जेदार पायाभूत सुविधा आणि नियोजनबद्ध नागरी विकासाचा लाभ मिळणार असून, झोपडपट्टीमुक्त मुंबईच्या दिशेने हे महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.

Mumbai News: मुंबईकरांसाठी गुड न्यूज! 'या' ठिकाणच्या झोपडपट्ट्यांचा होणार पुनर्विकास, ८५००० नागरिकांना मिळणार बिल्डिंगमध्ये घर
Mumbai News : अभिनेत्याने केला १६ वर्षीय मुलीचा लैंगिक छळ, पोलिसांनी ठोकल्या बेड्या

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com