Mumbai News : अभिनेत्याने केला १६ वर्षीय मुलीचा लैंगिक छळ, पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Television Actor Arrested : प्रसिद्ध अभिनेत्याला अटक करण्यात आली आहे. १६ वर्षीय मुलीचा लैंगिक छळ केल्याचा आरोप अभिनेत्यावर केला आहे.
Television Actor Arrested
Mumbai News Saam tv
Published On

मनोरंजन विश्वातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. मुंबई पूर्व उपनगरात एका १६ वर्षीय मुलीचा लैंगिक छळ करण्यात आला आहे. TOI च्या वृत्तानुसार, मुलीचा लैंगिक छळ, पाठलाग करणे, वारंवार फोन करणे आणि मारहाण केल्याप्रकरणी एका टेलिव्हिजन अभिनेत्याला पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी त्याच्यावर लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण (पोक्सो) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

मुलीचा पाठलाग करणे आणि तिला दुखापत करणे यासाठी पोक्सो कायद्याव्यतिरिक्त, पंत नगर पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 78 आणि 115 (2) चा कलम लावले आहेत. पोलिसांनी सांगितले की, एफआयआर नोंदवल्यानंतर पोलिसांनी अभिनेत्याला शुक्रवारी त्याच्या राहत्या घरातून अटक केली आणि त्याला विशेष पोक्सो न्यायालयात हजर केले, जिथेत्याला पोलीस कोठडी सुनावली.

Television Actor Arrested
Famous Actor : "मला बापाला मरताना नाही पाहायचंय..."; प्रसिद्ध अभिनेत्याच्या वडिलांची प्रकृती चिंताजनक, ढसाढसा रडतानाचा VIDEO व्हायरल

पूर्व उपनगरातील एका रहिवाशाने नोंदवलेल्या तक्रारीनुसार, आरोपीने अल्पवयीन मुलीला तिच्या मोबाईल फोनवरून तसेच इतर अनेक नंबरवरून वारंवार कॉल करून तिचा छळ केला. तक्रारीत पुढे आरोप करण्यात आला आहे की, ५ जुलै रोजी त्याने मुलीला तिच्या निवासी इमारतीजवळ गाठले, तिचा पाठलाग केला, वाद घातला, शिवीगाळ केली आणि तिला हाताने मारहाण केली.

अल्पवयीन आणि आरोपी हे ओळखीचे असल्याचे पोलिसांनी सांगितले. "फिर्यादीनंतर, गुन्हा दाखल करण्यात आला आणि आरोपीला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे" असे एक पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

Television Actor Arrested
Gaurav - Akanksha : घटस्फोटाच्या चर्चेदरम्यान गौरव खन्नाची Lock Upp 2 मध्ये एन्ट्री, नवऱ्याला पाहून आकांक्षानं असं काही केलं की VIDEO पाहून तुम्हालाही बसेल धक्का

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com