Sambhajinagar : प्ले स्कूलमधील निष्काळजीपणाचा कळस! २३ महिन्यांच्या चिमुकल्याला गंभीर दुखापत, ६ जणांविरोधात गुन्हा

Chhatrapati Sambhajinagar Play School Video : छत्रपती संभाजीनगरातील एका प्री-स्कूलमध्ये २३ महिन्यांच्या चिमुकल्याला गंभीर दुखापत झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
23-MONTH-OLD TODDLER INJURED AT SAMBHAJINAGAR PRESCHOOL, SIX BOOKED IN NEGLIGENCE CASE
23-MONTH-OLD TODDLER INJURED AT SAMBHAJINAGAR PRESCHOOL, SIX BOOKED IN NEGLIGENCE CASESaam Tv
Published On
Summary
  • छत्रपती संभाजीनगरातील प्री-स्कूलमध्ये २३ महिन्यांच्या मुलाला दुखापत

  • वर्गाचा दरवाजा बाहेरून लॉक करून कर्मचारी बाहेर

  • मुलांमध्ये झालेल्या झटापटीत मुलाच्या शरीरावर अनेक जखमा

  • सीसीटीव्ही फुटेजमध्ये घटना कैद

जन्मल्यानंतर मुलं थोडी रंगायला, बोबडी बोलायला लागली की आई वडील त्यांच्या शिक्षणाची स्वप्न पाहतात. आपलं मुलं इतरांपेक्षा काहीतरी वेगळं शिकेल या अनुषंगाने त्यांना वाढवतात. लहानपणापासून मुलं ॲक्टिव्ह राहावं यासाठी त्याला वेगवेगळ्या उपक्रमांमध्ये सहभागी करतात. मुलं १-२ वर्षांचं झालं की पुढे जाऊन शाळेत जाण्याची आवड निर्माण व्हावी या दृष्टिकोनातून प्ले स्कुलमध्ये पाठवतात. मात्र या प्लेस्कुलमध्ये आपलं मुलं खरच सुरक्षित आहे का? हा प्रश्न उपस्थित करणारी एक धक्कादायक घटना छत्रपती संभाजीनगरमध्ये घडली आहे. सिडको परिसरातील एका प्री-स्कूलमध्ये अवघ्या २३ महिन्यांच्या चिमुकल्याला शारीरिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागल्याची घटना समोर आली आहे. या घटनेनंतर पालकांमध्ये एकच संतापाची लाट उसळली आहे. याप्रकरणी एकूण ६ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरु आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सिडको एन-१ परिसरातील फर्स्टक्राय इंटेलिटॉट्स प्री-स्कूलमध्ये ही घटना २२ जून रोजी घडली. एका २९ वर्षीय वकिलाने आपल्या २३ महिन्यांच्या मुलाला सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास शाळेत सोडले होते. त्यानंतर सुमारे ११ वाजता वर्गातील मदतनीस महिला एका विद्यार्थ्याला बाहेर घेऊन गेली. मात्र, जाताना तिने वर्गाचा दरवाजा बाहेरून लॉक केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

23-MONTH-OLD TODDLER INJURED AT SAMBHAJINAGAR PRESCHOOL, SIX BOOKED IN NEGLIGENCE CASE
Bird Facts : प्रत्येक पक्षाची चोच वेगळी का असते? ९९% लोकांना माहिती नसेल कारण

दरम्यान, वर्गात कोणतीही शिक्षिका किंवा जबाबदार कर्मचारी उपस्थित नसल्याने लहान मुले घाबरून रडू लागली. काही काळ मुलांवर कोणाचेही लक्ष नसल्यामुळे वर्गात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. याच दरम्यान मुलांमध्ये झालेल्या झटापटीत तक्रारदाराच्या मुलाला गंभीर दुखापत झाली. त्याच्या चेहऱ्यावर, नाकावर, ओठांवर, छातीवर, पाठीवर आणि तळपायांवर जखमा झाल्या. तसेच इतर मुलांनी त्याच्या शरीरावर चावे घेतल्याचाही आरोप करण्यात आला आहे.

23-MONTH-OLD TODDLER INJURED AT SAMBHAJINAGAR PRESCHOOL, SIX BOOKED IN NEGLIGENCE CASE
Smart Meter : महाराष्ट्रात स्मार्ट मीटरचा धडाका; तब्बल १.५ कोटींहून अधिक ग्राहकांकडे स्थापना, पाहा A टू Z माहिती

विशेष म्हणजे, जखमी झालेल्या बालकाला तातडीने वैद्यकीय उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले नाही, असा आरोप पालकांनी केला आहे. त्यामुळे शाळा प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. घटनेची माहिती मिळताच पालकांनी पोलिसांत धाव घेतली. या प्रकरणी एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात शाळेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसह एकूण सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी घटनेचा तपास सुरू केला असून शाळेतील सीसीटीव्ही फुटेज, कर्मचारी आणि संबंधितांची चौकशी केली जात आहे. या घटनेनंतर शहरातील पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून प्ले स्कूलमधील सुरक्षाव्यवस्थेबाबत अधिक कठोर नियमांची गरज असल्याची मागणी जोर धरू लागली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com