Khan Sir FIR News: खान सर पाटणा न्यायालयात होणार सरेंडर, काय आहे प्रकरण?

Khan Sir FIR News: प्रसिद्ध कोचिंग गुरू खान सर आत्मसमर्पण करण्यासाठी पाटणा दिवाणी न्यायालयात दाखल झाले आहेत. त्यांच्यासोबत त्यांचे वकील आहेत. त्यांच्यावर शस्त्र कायदा आणि हत्येचा प्रयत्न या कलमांखाली गुन्हा दाखल झाला आहे.
Khan Sir Reaches Patna Court Amid Fir In Shooting Case, Surrender Discussions Gain Momentum
Khan Sir Reaches Patna Court Amid Fir In Shooting Case, Surrender Discussions Gain Momentum
Published On

प्रसिद्ध कोचिंग गुरू खान सर सरेंडर होण्यासाठी पाटणा दिवाणी न्यायालयात दाखल झाले आहेत. त्यांच्यासोबत त्यांचे वकील आहेत. शस्त्र कायदा आणि हत्येचा प्रयत्न या कलमांखाली गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांना अटक करण्यात येणार असल्याची चर्चा होती. खान ग्लोबल स्टडीज सेंटरबाहेर झालेल्या गोळीबाराच्या घटनेशी संबंधित एफआयआरमध्ये पाटणा पोलिसांनी खान सरांचे नाव घेतले आहे.

Khan Sir Reaches Patna Court Amid Fir In Shooting Case, Surrender Discussions Gain Momentum
Khan Sir: खान सर यांचं खरं नाव काय आहे?

खान सर यांच्यावर हत्येचा प्रयत्न आणि शस्त्र कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाटणा पोलिसांनी आज दुपारी एक निवेदन जारी करून विद्यार्थ्यांना कोचिंग सेंटर्समधील स्पर्धेला बळी न पडण्याचे आवाहन केले आहे. खान सरांच्या कोचिंग सेंटरबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. हाती आलेल्या माहितीनुसार खान सर उद्या न्यायालयात सरेंडर करतील असं सांगितलं जातंय.

Khan Sir Reaches Patna Court Amid Fir In Shooting Case, Surrender Discussions Gain Momentum
Khan Sir : मोठी खळबळ! खान सरांच्या कोचिंग इन्स्टिट्यूटवर ६ राऊंड गोळीबार; गोळ्या लागल्या अन्... २ तासांत काय काय घडलं?

बिहार पोलीस शिपाई भरती परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर खान सर यांचा प्रतिस्पर्धी कोचिंग संस्था ज्ञान बिंदू अकॅडमीसोबत वाद झाला होता. मंगळवारी रात्री खान सर यांच्या कोचिंग सेंटर काहींनी दगडफेक करत तोडफोड केली होती. याप्रकरणी ज्ञान बिंदू संचालक रोशन आंनदसह तिघांना अटक करण्यात आली होती.

दुसऱ्या दिवशी ज्ञान बिंदू यांनी तोडफोड झालेल्या रात्रीचा एक व्हिडिओ व्हायरल केला. यात खान सर यांचे दोन बॉडीगार्ड हवेत गोळीबार करताना दिसत होते. पोलिसांनी या व्हिडिओची सत्यता तपासून खान सर यांच्या दोन्ही बॉडीगार्डला अटक केली. त्याचप्रकरणात खान सर यांच्यावर अटकेची टांगती तलावर लटकली आहे.

पाटण्यातील खान सरांच्या कोचिंग सेंटरमधील गोळीबारासंदर्भात पोलिसांच्या निवेदनावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. २ जून रोजीच्या निवेदनात, पाटणा पोलिसांनी कोणताही गोळीबार झाल्याचे नाकारले होते. ४ जून रोजी गोळीबाराचा व्हिडिओ समोर आल्यानंतर, पोलिसांनी व्हिडिओमध्ये दिसलेल्या खान सरांच्या दोन्ही रक्षकांना अटक केली. दुसऱ्या एफआयआरमध्ये, पोलिसांनी गोळीबार झाल्याची पुष्टी केली. खान सर आणि त्यांच्या दोन रक्षकांना आरोपी म्हणून नाव देण्यात आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com