Mumbai News: मॅनहोलमध्ये 'तो' माणूस कसा पडला? १० सेकंदाचा थरारक सीसीटीव्ही VIDEO आला समोर

Man Falling Into Open Manhole In Mumbai: मुंबईतील साकीनाका परिसरात मॅनहोलमध्ये एक व्यक्ती पडली. या घटनेचा थरारक सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला आहे.

मुंबईत गेल्या दोन दिवसांपासून पावसाने धुमाकूळ घातला आहे. अनेक ठिकाणी सखल भागांमध्ये पाणी साचल्याच्या घटना घडल्या आहे. या पावसामुळे मुंबईकर हैराण झाले आहेत. अशातच मुंबईत एक मोठी दुर्घटना घडली. साकीनाका परिसरात मॅनहोलमध्ये पडून एका ६० वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. या घटनेचा थरारक सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये ही व्यक्ती मॅनहोलमध्ये कशी पडते हे स्पष्ट दिसत आहे.

साकीनाका परिसरात आज सकाळच्या सुमारास रस्त्यावरून जाणारी एक व्यक्ती अचानक २५ फूट खोल मॅनहोलमध्ये पडली. मॅनहोलमध्ये असणाऱ्या पाण्याच्या प्रवाहासोबत ही व्यक्ती वाहून गेली. अग्निशमन दल आणि पालिका कर्मचाऱ्यांनी या व्यक्तीला वाचवण्याचा प्रयत्न केला. बऱ्याच तासांच्या शोध मोहिमेनंतर या व्यक्तीचा मृतदेह सापडला. या घटनेमुळे आता पालिकेच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. या घटनेमुळे विरोधकांसोबत मुंबईकर आक्रमक झाले असून ते महापौरांना संतप्त सवाल विचारत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com